शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

खेड-शिवापूर टोलनाक्याजवळच्या भीषण अपघातात चार जण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 19:51 IST

पुण्यावरून साताऱ्याकडे मोटार चालली होती. रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या ट्रकला मागून मोटारीने जोरात धडक दिली.

खेड-शिवापूर : पुणे-सातारा महामार्गावर खेड शिवापूर टोलनाक्याजवळ मोटारीची उभ्या ट्रकला धडक बसून झालेल्या भीषण अपघातात चार जण ठार  झाले. यात शिंदेवाडी येथील एक व पुण्यातील तिघांचा समावेश आहे.हा अपघात सोमवारी (दि २५ जून ) सायंकाळी साडेचारच्या सुमारास झाला. मृतांमध्ये ओंकार पोळ (वय २७, शिंदेवाडी, भोर, मूळ रा. सांगली), अश्विनी असवले (वय ३६, पुणे स्वारगेट),  उज्वला सणस (वय ३५, वडगाव धायरी, पुणे),  अरुणा भोसले  (वय ३५) यांचा जागीच मृत्यू झाला. पुण्यावरून साताऱ्याकडे मोटार (एचएच १२, एचझेड 0२८९) चालली होती. रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या ट्रकला मागून मोटारीने जोरात धडक दिली. यात मोटारीतील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्याहून साता-याला जाणा-या आयटेन कारमध्ये कारचालक ओंकार पोळ याच्यासह अरुणा भोसले, उज्वला सणस आणि अश्विनी असवले या तीन महिला महिला प्रवास करत होत्या. खेड-शिवापूर टोलनाक्यापूर्वी काही मीटर अंतरावर एक ट्रक उभा होता.  दरम्यान, कारचालक ओंकार पोळ याचे नियंत्रण सुटल्याने ट्रकवर पाठीमागून आदळली. हा अपघात इतका भीषण होता की ही कार ट्रकमध्ये जाऊन फसली. या कारला क्रेनच्या साहाय्याने ओढून काढावे लागले. चालकासह जखमी झालेल्या तीनही महिलांना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सर्व जण नातेवाइकाच्या दशक्रिया विधीसाठी सातारा याठिकाणी चालले होते. येथील हॉटेल सागरच्या समोर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला मोटार धडकली. या अपघातानंतर पुन्हा एकदा महामार्गावर होणारे अनधिकृत पार्किंग व रस्त्यांची अपूर्ण कामे हा प्रश्न समोर आला आहे.  .......................

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातDeathमृत्यूPoliceपोलिस