शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्या चौघांची येरवडा कारागृहात रवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 12:33 IST

बारामती शहरातील पहिलीच कारवाई

सांगवी (बारामती) : सोशल मीडियावर शास्त्रांचे स्टेट्स व हातात शस्त्र घेऊन परिसरात दहशत माजवणाऱ्या तरुणांना अखेर तुरुंगाची हवा खायला जावे लागले आहे. बारामती शहरातील ही पहिलीच कारवाई असल्याची माहिती बारामतीचे अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी दिली. या कारवाईमुळे मात्र यापुढे शास्त्रांचा धाक दाखवून दहशत माजवणाऱ्यावर जरब बसेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. त्यमित्ताने समाजात भीतीचे वातावरण निर्माण होणार नाही. 

सोशल मीडियावर फेसबुक, इंस्टाग्राम तसेच व्हाट्सअप च्या माध्यमातून शस्त्रे हातात घेऊन स्टेटस ठेवणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याचा इशारा बारामती पोलीस प्रशासनाने दिलेला होता, त्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाने ठोस पावले उचलून अप्पर पोलीस अधीक्षक यांनी बारामती शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कोयता हातात घेऊन मिरवणाऱ्या आरोपींविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.आरोपी योग्य जामीनदार हजर करू न शकल्याने आरोपी यश दीपक मोहिते,शुभम उर्फ बाळू काळू जगताप दोघे रा. आमराई,  बारामती),आदित्य राजू मांढरे रा.  चंद्रमणी नगर अमराई बारामती) व अनिकेत केशवकुमार नामदास रा. दीपनगर भवानीनगर ता. इंदापूर जि. पुणे ) या चौघांची मध्यवर्ती कारागृह येरवडा पुणे येथे साध्या कारावासासाठी रवानगी करण्यात आली.  सदरचा प्रतिबंधात्मक कारवाईचा प्रस्ताव हा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास नाळे यांनी अप्पर पोलीस अधीक्षक बारामती कार्यालयास पाठवलेला होता. त्यानुसार पुढील कारवाई करण्यात आली. 

पोलिसांकडून इशारा यापुढे देखील जागरूक नागरिकांनी अशा पद्धतीचे स्टेटस सोशल माध्यमावर ठेवणाऱ्या इसमांचे स्क्रीन शॉट घेऊन शक्ती नंबरवर किंवा प्रभारी अधिकारी यांना पाठवल्यास त्या आरोपींवर तात्काळ कारवाई करण्यात येईल व बातमीदार यांचे नाव गोपनिय ठेवण्यात येईल असे आवाहन बारामती शहर पोलिसांनी केले आहे.

शक्ती नंबरचा वापर करण्याचे आवाहन जागरूक पालकांनी,शिक्षकांनी,तसेच नागरिकांनी शहरातील चौका चौकात टवाळखोरी करणाऱ्या, शाळा महाविद्यालय परिसरात मुलींची छेडछाडी करणाऱ्या,उघड्यावर मद्य प्राशन करणाऱ्या युवकांची माहिती व फोटो शक्ती नंबर 9209394917 वर  पाठवावी त्यांच्यावर योग्य कायदेशीर कारवाई करण्यात येईल. असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडyerwada jailयेरवडा जेलCrime Newsगुन्हेगारीArrestअटकPoliceपोलिस