जेवण न दिल्याने चौघांकडून हॉटेल व्यावसायिकाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 17:45 IST2020-01-10T17:44:59+5:302020-01-10T17:45:23+5:30

जेवण न दिल्याने चार जणांनी हॉटेल व्यावसायिकाला सिमेंटच्या ब्लॉकने मारहाण

Four hit to hotel businessman for given don't provide food | जेवण न दिल्याने चौघांकडून हॉटेल व्यावसायिकाला मारहाण

जेवण न दिल्याने चौघांकडून हॉटेल व्यावसायिकाला मारहाण

ठळक मुद्देनिगडीतील प्रकार : देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पिंपरी : हॉटेल बंद झाल्यानंतर जेवण न दिल्याने चार जणांनी हॉटेल व्यावसायिकाला सिमेंटच्या ब्लॉकने मारहाण केली. यात व्यावसायिक जखमी झाला. निगडी येथे सोमवारी (दि. ६) रात्री साडेअकराला  ही घटना घडली. 
जय तिमप्पा पुजारी (वय ४१, रा. निगडी गावठाण) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि. ९) फिर्याद दिली आहे. त्यानुसार, चार अनोळखी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री साडेअकराला फिर्यादी पुजारी त्यांचे हॉटेलचे पुढील गेट बंद करून हॉटेलमध्ये कामगारांसोबत आवराआवर करत होते. त्यावेळी चार अनोळखी आरोपी हॉटेलच्या मागील दाराने आले. त्यांनी पुजारी यांना जेवण मागितले. हॉटेल बंद झाले आहे. जेवण मिळणार नाही, असे पुजारी यांनी सांगितले. त्यामुळे चिडून चौघांनी पुजारी व त्यांच्या हॉटेलमधील कामगारांना शिवीगाळ केली. एका आरोपीने रस्त्यावरील सिमेंटचा ब्लॉक पुजारी यांच्या डोक्यात मारला. यात पुजारी जखमी झाले. तसेच कामगार प्रबास बिश्वास याला देखील मारहाण केली. अन्य आरोपींनी हॉटेलवर दगड मारून चारचाकी वाहनातून मुंबईच्या दिशेने पळून गेले. उपचारानंतर पुजारी यांनी गुरुवारी देहूरोड पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: Four hit to hotel businessman for given don't provide food