शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

मेल, एक्स्प्रेस रेल्वे गाड्यांना जनरलचे चार डब

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 18:20 IST

-ऐनवेळी प्रवास करणाऱ्यांना मिळणार जागा

- अंबादास गवंडीपुणे : रेल्वे बोर्डाच्या नव्या नियमानुसार मेल, एक्स्प्रेस रेल्वे गाड्यांना चार जनरल डबे जोडण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे रेल्वे विभागातून सुटणाऱ्या सर्व एक्स्प्रेस गाड्यांना फेब्रुवारी अखेरपर्यंत चार जनरल डबे जोडण्याचे काम सुरु आहे. सध्या काही ठराविक गाड्यांना चार जनरल डबे जोडण्यात आले असून, लवकरच त्याचे काम पूर्ण होणार आहे. त्यामुळे ऐनवेळी प्रवास करणाऱ्यांना जागा मिळणार असून, त्यांची सोय होणार आहे.

कोरोनानंतर रेल्वे गाड्यांच्या डब्यांची संख्या कमी करण्यात आली होती. त्यामुळे अनेक गाड्यांना दोनच जनरल डबे जोडण्यात आले होते. तर काही गाड्यांना जनरल डबेच नव्हते. त्यामुळे ऐन वेळी प्रवास करणाऱ्यांची अडचण होत होती. त्यामुळे प्रवाशांकडून जनरल डबे वाढविण्यासाठी वारंवार मागणी केली जात होती. परंतु याकडे दुर्लक्ष केले जात होते. पुण्यातून उत्तर भारतात जाणाऱ्या गाड्यांना खूपच गर्दी असल्यामुळे चार ते सहा जनरल डबे जोडावे, अशी मागणी प्रवाशांनी रेल्वे बोर्डाला केली होती. त्यानुसार बोर्डाने चार जनरल डबे बसविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे काही गाड्यांना जनरल डबे बसविण्यात येत आहे.

पुणे रेल्वे विभागातून जवळपास ७३ गाड्या धावतात. त्यापैकी काही लोकल, तर काही साप्ताहिक तर काही दररोज सुटणाऱ्या आहेत. एक्स्प्रेस गाड्यांना जनरल डबे जोडण्यास रेल्वे प्रशासनाने सुरुवात केली. त्यानुसार आतापर्यंत २४ रेल्वे गाड्यांना जनरल डबे जोडण्यात आले आहेत. यामध्ये दानापूर, हावडा, जम्मू तावी झेलम एक्स्प्रेस, कन्याकुमारी, नांदेड, दरभंगा, जोधपूर, एर्नाकुलम व इतर गाड्यांचा समावेश आहे.

प्रवासी वाढणार

एका डब्यात ८० ते ८५ नागरिक प्रवास करतात. यापूर्वी रेल्वे गाड्यांना दोन डबे जोडण्यात येत होते. त्यामुळे एेनवेळी प्रवास करणाऱ्यांची अडचण होत होती. आता डब्यांची संख्या वाढल्यामुळे जवळपास ४०० नागरिक प्रवास करू शकतात. शिवाय चेंगराचेंगरी, जागेसाठी होणारी मारामारी या घटना कमी होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रrailwayरेल्वेRailway Passengerरेल्वे प्रवासी