शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

नदीपात्रात पाण्याची मोटार सोडताना विजेच्या धक्क्याने ४ शेतकऱ्यांचा दुर्देवी मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2022 14:47 IST

राजगड पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून अधिक तपास सुरू

नसरापूर  : भोर तालुक्यातील निगडे या गावामध्ये नदीपात्रात पाण्याची मोटार सोडत असताना विजेचा धक्का लागून एकाच गावातील चार शेतकरी घटनास्थळी मृत्युमुखी पडल्याची दुर्देवी घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेत बापलेकांचा समावेश आहे. गुंजवणी नीरा नदीपात्रातील पाण्यात मोटार ढकलत असताना अचानक गेलेली वीज परत आल्याने आणि पाण्यात वीजप्रवाह उतरल्यामुळे चौघांचा जागीच मृत्यू झाला अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे.

 या दुर्दैवी घटनेत निगडे येथील विठ्ठल सुदाम मालुसरे (वय ४८वर्षे), सनी विठ्ठल मालुसरे(वय २४ वर्षे), अमोल चंद्रकांत मालुसरे (वय ३५ वर्षे), आनंदा ज्ञानोबा जाधव (वय ५८ वर्षे) (सर्व रा. निगडे ता.भोर जि. पुणे) अशी मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे असून चौघांचे मृतदेह मिळाले असून घटनास्थळी ग्रामस्थ, महसूल, महावितरण, राजगड पोलीस दाखल झाले आहेत. आमदार संग्राम थोपटे, पोपटराव सुके, कुलदीप कोंडे, जीवन कोंडे आदी नेतेगण यावेळी घटना स्थळी उपस्थित होते. 

निगडे ( ता. भोर) येथील गुंजवणी नदीपात्रातील लगत असणाऱ्या शेतासाठी पाणी लागत होते. विज पुरवठा खंडीत असताना घटनेतील चारही जणांनी अवजड असलेला पाणी ओढण्याचा शेती पंप पाण्यात सोडत होते. तेव्हा खंडीत वीजपुरवठा पुन्हा सुरळीत झाल्याने विजेच्या धक्याने चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने निगडे गावावर दुःखाचा डोंगर उभा राहीला आहे. सदर घटना गुरुवारी (दि.१५) सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. राजगड पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून अधिक तपास सुरू आहे.

टॅग्स :Puneपुणेbhor-acभोरelectricityवीजSocialसामाजिकFarmerशेतकरीDeathमृत्यू