शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

मालवाहू ट्रक- टेम्पोच्या भीषण अपघातात चार जण ठार; नगर-कल्याण मार्गावरील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2020 15:31 IST

पहाटे सव्वापाच वाजता झाला अपघात; ठार झालेले चारही जण नगरचे..

आळेफाटा : मालवाहू ट्रक आणि लहान टेम्पोची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात चार जण जागीच ठार झाले. नगर कल्याण महामार्गावर परिसरातील दांगटमळा येथे शुक्रवारी पहाटे सव्वापाचला ही घटना घडली.      आकाश सुरेश रोकडे (वय २४), सुरेश नारायण करंदीकर (वय ४२),  सिध्दार्थ राजेश करंदीकर (वय २३), सुनील विलास उघडे उर्फ करंदीकर (वय २१, सर्व रा करंडी ता पारनेर जि.अहमदनगर) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. आळेफाटा पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार भाजी वाहतुक करणारा लहान टेम्पो क्रमांक (एम.एच. १६ सी.सी. ६३८८) ओतुरहून आळेफाटा येथे जात होता. तर  एक आशयर ट्रक (एम. एच. १६ ए. ई. ९०८०) कल्याणला भरधाव वेगाने जात होता. शुक्रवारी पहाटेच्या वेळी कल्याण नगर महामार्गावर वडगाव आनंद शिवारातील दांगटमळावस्ती येथे टेम्पो आणि ट्रकची जोरात धडक झाली. या अपघातात लहान टेम्पोमधील आकाश रोकडे, सुरेश करंदीकर, सिद्धार्थ करंदीकर व सुनील उघडे उर्फ करंदीकर या चौघांचा मृत्यू झाला.  यापैकी २ जण जागेवरच ठार झाले. एकाचा आळेफाटा येथे दवाखान्यात नेत असताना तर एकाचा दवाखान्यात उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याचे पोलीसांनी सांगितले. या घटनेत आयशर ट्रकचा चालक किरकोळ जखमी झाला. घटनेचे वृत्त समजताच पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर पोलीस कर्मचा-यांसह तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. सुरज रोकडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून  आळेफाटा पोलिसांनी ट्रक चालकाविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक टी वाय मुजावर यांचे मार्गदर्शनाखाली फौजदार सतीश डौले करत आहे.

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातDeathमृत्यू