शहरं
Join us  
Trending Stories
1
चांदी २०% प्रीमियमवरही मिळेना; ऑनलाइन भाव अडीच लाखांवर
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑक्टोबर २०२५: कामात यश मिळेल, आर्थिक लाभ होईल अन् आत्मविश्वासही वाढेल!
3
‘घोटाळ्याच्या १५ वर्षांनी घेतला अनिल पवारांनी पदभार; ईडीकडे पुरावा नाही’
4
सॅटेलाईट आधारित टोल यंत्रणा लांबणीवर, ऑपरेशन सिंदूरमुळे घेतला निर्णय...
5
गुजरातमध्ये भाजपचे धक्कातंत्र; सर्वच्या सर्व १६ मंत्र्यांचे राजीनामे
6
मोठे यश! शास्त्रज्ञांनी बनवली 'युनिव्हर्सल किडनी'; रुग्णाचा कोणताही रक्तगट असुदे, प्रत्यारोपण करता येणार
7
मतपत्रिकांचा पर्याय आहे पण; आयोगाकडे मतपेट्याच नाहीत, युती सरकारनेच केली होती तरतूद
8
देशभर ऑनलाइन जुगारावर बंदी घालण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात आज जनहित याचिकेवर सुनावणी 
9
ट्रम्प म्हणाले, ब्रेकिंग न्यूज देऊ का? रशियाचे तेल घेणे भारत थांबवणार   
10
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी आम्हाला पुरेसे मनुष्यबळ द्या!
11
रेल्वे प्लॅटफॉर्मवर व्हिडीओ कॉलवरून केली प्रसूती; थ्री इडियट्ससारखा चमत्कार
12
मालकाच्या मृत्यूनंतर नऊ दिवस लोटले, कुत्रा स्मशानभूमीतच थांबून...
13
देशात शिक्षण, परदेशात सेवा! टॉप-१०० आयआयटीयनपैकी ६२ जणांचा परदेशी ओढा
14
अमेरिकेत रिपोर्टिंगवर निर्बंध; पत्रकारांनी सोडले पेंटागॉन, ॲक्सेस बॅज केले परत 
15
‘एनडीए’चे २३७ उमेदवार जाहीर; प्रचाराला चढला रंग
16
रेकी झाली... टार्गेट ठरले... पण लूट दुसऱ्याच दुकानात, तीन मित्रांच्या पहिल्याच चोरीचा शेवट पोलिस कोठडीत
17
कुंभमेळा आयोजनाची कामं नियोजित वेळेत पूर्ण झाली पाहिजेत; मुख्य सचिव राजेश कुमारांचे निर्देश
18
VIDEO: बापरे !! महाकाय अजगराने महिलेच्या पायाला घातला विळखा, महिलेचे धाडस पाहून सारे थक्क
19
Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी

पुणे जिल्ह्यातील चार धरणं झाली फुल्ल; नागरिकांच्या पाण्याची चिंता दूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2021 22:06 IST

उजनी धरण ‘प्लस’मध्ये ३.२८ टीएमसी पाणी

पुणे : पुणे जिल्ह्यातील कळमोडी, वडीवळे, आंध्रा आणि खडकवासला धरणे शंभर टक्के भरली आहेत. त्यामुळे नागरिकांच्या पाण्याची चिंता दूर झाली आहे. पुणे, सोलापूर आणि अहमदनगर-उस्मानाबाद जिल्ह्याचा काही भागासाठी महत्त्वाचे असलेले उजनी धरण 'प्लस' मध्ये आले असून ६.१२ टक्के भरले (३.२८ टीएमसी) आहे.

जिल्ह्यातील टेमघर धरण क्षेत्रात सवार्धिक १३० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्याखालोखाल मुळशी धरण क्षेत्रात २४ तासांत १२८ मिलिमीटर पाऊस झाला आहे. तर वरसगाव आणि पानशेत धरण क्षेत्रात प्रत्येकी ११८ मिलीमीटर आणि निरा देवघर धरण क्षेत्रात ११७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. खडकवासला धरण क्षेत्रात ३५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. खडकवासला धरण १०० टक्के भरले आहे. दुपारी १ वाजता ३४१२ क्यूसेसने खडकवासला धरणातून विसर्ग केलेला आहे. तर वडज, येडगाव, घोड आणि विसापूर धरण क्षेत्रात सवार्त कमी म्हणजे ० टक्के पावसाची नोंद आहे.

वीर धरण ७१ टक्के भरले; पाण्याचा विसर्ग सुरु

नीरा : वीर धरण क्षेत्रात गेली दोन दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे वीर धरणात पाण्याची आवक वाढत असल्याने पाणीपातळीमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे वीर धरण विद्युत गृहातून रात्री ८:०० वाजता ८०० क्युसेक्स वेगाने निरा नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग सुरु होत आहे. पाण्याचा प्रवाह सुरू करण्यात येत असल्याने नदीकाठच्या गावतील सर्वांनी काळजी घ्यावी, निरा नदी पात्रात कोणीही जाऊ नये, असे आव्हान निरा पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे.वीर धरण शुक्रवारी सायंकाळी आठ वाजता ७१ टक्के भरले होते. धरण साखळीत पावसाचे प्रमाण वाढते असल्याने सायंकाळी आठ वाजता विद्युत गृहातून ८००क्युसेक्स वेगाने विसर्ग सोडण्यात आला, धराणीतल पाण्याचा विसर्ग सुरु झाल्यानंतर नदितिरावरील सर्वांना सतर्कतेचा इशारा देण्यात यावा असे आव्हाण तीरावरील गावातील प्रशासनाल देण्यात आला आहे.

------------------

जिल्ह्यातील प्रमुख धरणांमधील उपयुक्त पाणी साठ्याची माहिती

धरण -              प्रकल्प साठा -         सध्याचे टीएमसी

खडकवासला       १.९७                       १.९७

वरसगाव           १२.८२                      ७.८७

पानशेत            १०.६५                      ७.६९

टेमघर            ३.७१                         १.८६

पवना            ८.५१                          ५.७९

कळमोडी        १.५१                       १.५१

चासकमान     ७.५८                       ४.४५

आंध्रा             २.९२                       २.९२

मुळशी           १८.४७                  ११.१०

नीरा देवघर    ११.७३                  ८.९४

वडीवळे          १.०७                  ०.९९

भाटघर          २३.५०              ११.२५

वडज            १.१७                 ०.५५

वीर              ९.४१                  ६.७०

उजनी          ५३.५७               ६.१२

डिंभे           १२.४९               ६.६६

भामा आसखेड ७.६७           ५.२२

कासारसाई   ०.५७               ०.४८

येडगाव         २.८०             १.०२

घोड           ५.४७                ०.८५

विसापूर     ०.९०               ०.०८

पिंपळगाव जोगे ३.८९ -     ०.८०

माणिकडोह  १०.१७          २.७७

गुंजवणी ३.६९                 २.६७

 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडRainपाऊसWaterपाणीDamधरण