शरद बँकेचे एटीएम फोडून सव्वा चार लाख रुपये लंपास; राजगुरुनगर येथील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2023 20:27 IST2023-03-15T20:27:14+5:302023-03-15T20:27:22+5:30
चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले असून या घटनेचा पुढील तपास खेड पोलीस करत आहेत

शरद बँकेचे एटीएम फोडून सव्वा चार लाख रुपये लंपास; राजगुरुनगर येथील घटना
राजगुरूनगर: शरद बँकेचे एटीएमएटीएम मशीन फोडून सुमारे चार लाख पंचवीस हजार रुपये चोरीला गेल्याची घटना दि १४ राजगुरूनगर येथे घडली आहे. याबाबत बँक मॅनेजर ज्योती आत्माराम थोरात (रा. मोरया गार्डन सोसायटी, कोथरूड पुणे , मुळ रा. बोडके नगर ता. जुन्नर ) यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
राजगुरुनगर येथील पुणे - नाशिक महामार्गालगत हुतात्मा राजगुरू महाविद्यालयासमोर शिवम कॉम्प्लेक्स मध्ये पहिल्या मजल्यावर शरद सहकारी बँकेची शाखा आहे. बँकेचे एटीम सेंटर बँकेचे खाली तळमजल्यावर आहे. (दि१४ रोजी ) रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी एटीएम सेंटर फोडून सुमारे चार लाख पंचवीस हजार आठशे रुपये चोरून नेले. चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले असून या घटनेचा पुढील तपास खेड पोलीस करित आहे.