पुणो : स्वच्छ भारत अभियानासाठी स्वेच्छेने वेळ देणा:या पुणोकरांसाठी पालिकेकडून व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्या अंतर्गत ज्या नागरिकांना या अभियानात सहभागी व्हायचे आहे त्यांच्यासाठी स्वच्छतेचे काम आणि त्यासाठी आवश्यक असलेले साहित्य उपलब्ध करून देण्याची जबाबदारी पालिकेकडून उचलण्यात येणार आहे. यासाठीचा स्वतंत्र आराखडा तयार करण्याच्या सूचना सर्व क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आली असून, येत्या काही दिवसांत त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी दिले असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात स्वच्छ भारत अभियान राबविण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार, प्रत्येक भारतीय या अभियानात आठवडय़ाला दोन तास आणि वर्षभरात दोनशे तास देशसेवेसाठी द्यावेत असे आवाहन केले आहे. या आवाहानाला प्रतिसाद देत मागील महिन्यात या अभियानाची देशभरात धूमधडाक्यात सुरुवात करण्यात आली आहे. मात्र, त्यानंतरही या अभियानात काम करण्यास नागरिक, शालेय संस्था, संस्था तसेच व्यावसायिक अस्थापना, युवा संघटना इच्छुक आहेत. त्यांच्याकडून हा उपक्रमही राबविला जात आहे. मात्र, या सर्वाना एकाच व्यासपीठावर आणण्यासाठी पालिकेकडून स्वतंत्र आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्या अंतर्गत या अभियानात वेळ देऊ इच्छिणारे नागरिक आपल्या परिसरातील क्षेत्रीय कार्यालयाशी संपर्क साधून त्यांच्या माध्यमातून स्वच्छता उपक्रमात सहभागी होऊ शकतील, अशा नागरिकांचे गट करून क्षेत्रीय कार्यालय आपल्या परिसरातील शाळा, सार्वजनिक ठिकाणो, नदीपात्र, रस्ते यांच्या ठिकाणी स्वच्छता मोहिमा घेतील असे या आराखडय़ाचे नियोजन असणार आहे. त्यात एखाद्या संस्था अथवा कंपन्याही सहभागी होतील यासाठी पालिकेकडून प्रयत्न केल जाणार असल्याची माहिती 22 पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख सुरेश जगताप यांनी दिली. (प्रतिनिधी)
च्या आराखडय़ानुसार, महापालिका नागरिकांची माहिती संकलित करून त्यांच्या वेळेनुसार, स्वच्छता मोहीम आयोजित करण्याचे नियोजन करणार आहे. या मोहिमांसाठी आवश्यक असलेले सर्व साहित्य तसेच पालिकेच्या कर्मचा:यांची फौज महापालिका पुरविणार आहे.
च्इतर शासकीय आस्थापनांचे कर्मचारी
यात सहभागी होऊ इच्छित असतील तर त्यांच्यासाठीही विशेष उपाययोजना करण्यात येणार असल्याचे जगताप
यांनी स्पष्ट केले.