देहूरोड कॅन्टोन्मेंटच्या माजी उपाध्यक्ष अमीन शेखला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 18:47 IST2018-04-24T18:44:39+5:302018-04-24T18:47:11+5:30
तीन वर्षांपूर्वी एका इसमास पळवून नेवून मारहाण केल्याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देहूरोड कॅन्टोन्मेंटच्या माजी उपाध्यक्ष अमीन शेखला अटक
देहूरोड : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या माजी उपाध्यक्षाला सोमवारी देहूरोड पोलिसांनी अटक केली. प्राणघातक हल्ला करणे, खुनाचा प्रयत्न करणे , मारामारी करणे, धमकावणे आदी गुन्ह्यात पोलीस त्याचा शोध घेत होते. अटक करुन त्याला वडगाव मावळ न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला येत्या शुक्रवारपर्यंत ( दि. २७) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत .
अमीन मेहबूब शेख ( वय ५१ , रा. मुख्य बाजारपेठ, देहूरोड) यास अटक केली आहे. गेल्या तीन वर्षांपासून शेख फरारी होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन वर्षांपूर्वी एका इसमास पळवून नेवून मारहाण केल्याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी सायंकाळी देहूरोड भागात येणार असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून शेख यास अटक केली. सहायक पोलीस निरीक्षक विनोद घोळवे पुढील तपास करीत आहेत .