माजी कसोटीपटू सदानंद मोहोळ यांचे हृदयविकाराने निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2022 09:48 IST2022-08-01T09:46:05+5:302022-08-01T09:48:13+5:30

हृदयविकाराच्या धक्क्याने निधन...

Former Test player Sadanand Mohol passed away due to heart attack | माजी कसोटीपटू सदानंद मोहोळ यांचे हृदयविकाराने निधन

माजी कसोटीपटू सदानंद मोहोळ यांचे हृदयविकाराने निधन

पुणे : माजी कसोटीपटू आणि महाराष्ट्र क्रिकेट संघाचे वेगवान गोलंदाज सदानंद मोहोळ यांचे शनिवारी रात्री ११.३०च्या सुमारास हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. निधनसमयी ते ८३ वर्षांचे होते. माजी खासदार अशोक मोहोळ यांचे ते ज्येष्ठ बंधू होते. सदानंद मोहोळ यांच्या पश्चात पत्नी शीला आणि मुलगा कृणाल असा परिवार आहे. रविवारी दुपारी १२ वाजता वैकुंठ स्मशानभूमीमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सदानंद मोहोळ यांना अखेरचा निरोप देण्यासाठी त्यांचे समकालीन क्रिकेटपटू व माजी कसोटीपटू चंंदू बोर्डे, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे (एमसीए) सचिव रियाझ बागवान, माजी रणजीपटू अन्वर शेख, निकी सलढाना, सतीश पेडणेकर, मिलिंद गुंजाळ, अनिल वाल्हेकर, अनंत धामणे, विश्वास गोरे, सुधीर कुलकर्णी, अरविंद मेहंदळे, सुरेश ढुमके यांच्यासह क्रीडाक्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

याचबरोबर राजकीय क्षेत्रातून जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार संजय जगताप, माजी प्रदेश उपाध्यक्ष देवीदास भंसाळी, माजी महापौर मुरलीधर मोहोळ व अंकुश काकडे, माजी उपमहापौर दिलीप बराटे, बाळासाहेब गांजवे, थिएटर असोसिएशनचे अध्यक्ष कुदळे उपस्थित होते.

Web Title: Former Test player Sadanand Mohol passed away due to heart attack