शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

गुजरवाडीतील माजी सरपंच आणि त्याचा साथीदार खून करून फरार, गुन्हे शाखेने दोघांना केली दोन दिवसात अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 17:46 IST

गुजरवाडीतील खुनाचा गुन्हा गुन्हे शाखेकडून उघडकीस

ठळक मुद्देमंगळवारी रात्री दहाच्या सुमारास मोहन चौंडकर यांच्या डोक्यात विटा आणि दगड मारुन केला खून

पुणे: कात्रज येथील गुजरवाडीमध्ये झालेल्या खुनाचा गुन्हा गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने उघडकीस आणला असून दोघांना अटक केली आहे. विकास रमेश चव्हाण (वय ३१, रा. गुजरवाडी, कात्रज) आणि सचिन जालिंदर डाकले (वय २९) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या दोघांनी मोहन चौंडकर (वय ३२, रा. खलाटेनगर, मांगडेवाडी) यांचा खून केला होता. विकास चव्हाण हा हवेली तालुक्यातील पेंजर गावाचा माजी सरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहे. मोहन चौंडकर हा ग्रामपंचायत सदस्याच्या मामीचा सख्खा भाऊ होता. या प्रकरणी मोहन चौंडकर याची पत्नी पूजा हिने भारती विद्यापीठ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास मोहन चौंडकर यांच्या डोक्यात विटा आणि दगड मारुन खून करण्यात आला होता.विकास चव्हाण याने मोहन चौंडकर यांना खलाटेनगर येथे एक गुंठा जमीन घेऊन दिली होती. विकास याने तेथे लाईट व इतर सुविधा उपलब्ध करुन देतो, असे सांगितले होते. परंतु, ते ती उपलब्ध करुन देऊ शकले नव्हते. त्यामुळे त्यांनी शेजारुन मोहन यांना लाईट व पाण्याचे कनेक्शन घेऊन दिले होते.

विकास याच्या मित्राने मोहन यांच्या शेजारीच जमीन घेतली होती. तेथे बांधकाम सुरु होते. विकास चव्हाण, सचिन डाकले व मोहन चौंडकर हे १८ मे रोजी रात्री दारु पित बसले होते. यावेळी मोहन याने त्याला लाईट व इतर सुविधा उपलब्ध करुन न दिल्याचा विषय काढला. त्यावरुन त्यांच्यात वादावादी सुरु झाली. तेव्हा विकास व सचिन यांनी शिवीगाळ करुन मोहन यांस बांधकाम साईटवरील विटांनी मारहाण करुन खून केला व ते पळून गेले होते. या घटनेची माहिती मिळाल्यावर भारती विद्यापीठ पोलिसांबरोबर गुन्हे शाखेची पथके आरोपींचा शोध घेत होती. खंडणी विरोधी पथकाकडील पोलीस नाईक संजय भापकर यांना आरोपी हे शिरवळ येथे निघून गेल्याची माहिती मिळाली. त्यानुसार खंडणी विरोधी पथकाचे अधिकारी व कर्मचारी शिरवळ फाटा येथे गेले. त्यांनी दोघांना ताब्यात घेतले. पुढील तपासासाठी दोघांना भारती विद्यापीठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीArrestअटकkatrajकात्रज