माजी खासदार गजानन बाबर शिवसेनेत परतले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2019 21:17 IST2019-04-25T21:15:24+5:302019-04-25T21:17:15+5:30
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बाबर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. भगवा ध्वज आणि उपरणे देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.

माजी खासदार गजानन बाबर शिवसेनेत परतले
पिंपरी - मावळ लोकसभा मतदारसंघाचे पहिले शिवसेना खासदार गजानन बाबर आज (गुरुवारी) पुन्हा स्वगृही परतले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बाबर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. भगवा ध्वज आणि उपरणे देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.
2014 मध्ये तिकीट नाकारल्यानंतर बाबर यांनी मनसेत प्रवेश केला होता. त्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीवेळी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर बाबर यांनी आज पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेनेत असताना बाबर यांनी सलग तीनदा नगरसेवक, दोनदा आमदार आणि एकदा खासदारकी शिवसेनेकडून भूषिवेले होते.