माजी मंत्री बबनराव पाचपुते अपघातातून थोडक्यात बचावले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2018 12:35 AM2018-06-30T00:35:32+5:302018-06-30T00:39:57+5:30

माजी मंत्री बबनराव पाचपुते शुक्रवारी रात्री साडेदहा वाजता भीषण अपघातातून थोडक्यात बचावले.

Former minister Babanrao Pachpute escaped from a car accident | माजी मंत्री बबनराव पाचपुते अपघातातून थोडक्यात बचावले

माजी मंत्री बबनराव पाचपुते अपघातातून थोडक्यात बचावले

शिरूर : माजी मंत्री बबनराव पाचपुते शुक्रवारी रात्री साडेदहा वाजता भीषण अपघातातून थोडक्यात बचावले आहेत.  त्यांच्या गाडीला शिरुरजवळ रात्री 10.30 च्या सुमारास भीषण अपघात झाला. पाचपुते यांच्या गाडीला रात्री 10.30 च्या सुमारास शिरुरजवळ कानीफनाथ फाटा परीसरातील हाॅटेल सदगुरू वडेवाले इथे भीषण अपघात झाला. पाचपुते यांची कार मालवाहतूक करणाऱ्या ट्रकला धडकली.

पाचपुतेंची कारही ट्रकला मागील बाजूस जोरदार आदळली, यात कारच्या समोरील बाजूचा भाग पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. परंतु, नशीब बलवत्तर म्हणून बबनराव पाचपुते यांना कुठलीही ईजा झाली नाही. बातमी कळताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेऊन तर अनेकांनी मोबाईलवरुन पाचपुतेंची विचारपूस करत धीर दिला.

Web Title: Former minister Babanrao Pachpute escaped from a car accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.