इंदापूरचे माजी सभापती रमेश जाधव अपघातात गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2019 11:02 AM2019-10-17T11:02:14+5:302019-10-17T11:03:10+5:30

भिगवणकडून बारामतीच्या दिशेने जाताना मदनवाडी हद्दीतील वळणावर हा अपघात झाला.

Former Indapur president Ramesh Jadhav is critically injured in the accident | इंदापूरचे माजी सभापती रमेश जाधव अपघातात गंभीर जखमी

इंदापूरचे माजी सभापती रमेश जाधव अपघातात गंभीर जखमी

googlenewsNext

भिगवण : इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती रमेश जाधव यांच्या बोलेरो गाडीचा आणि एसटीचा भीषण अपघात बारामती - भिगवण रोडवरील पिंपळे गावच्या हद्दीत आज गुरुवारी (दि.१७) अपघात झाला. या अपघातात रमेश जाधव हे गंभीर जखमी झाले आहेत.

भिगवणकडून बारामतीच्या दिशेने जाताना मदनवाडी हद्दीतील वळणावर हा अपघात झाला. बोलेरो (एम.एच. ४२ झेड २९२९) आणि एसटी (एम. एच ४० ए ९०२ ) चा भीषण अपघात झाला. यामध्ये बोलेरो गाडी चक्काचूर झाली आहे. जाधव यांच्यावर भिगवण येथील खासगी आयसीयु सेंटरमध्ये  प्राथमिक उपचार करून पुढील उपचारांसाठी पुण्याला हलविण्यात आले आहे.

जाधव यांच्या पायाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाल्याची माहिती मिळत आहे. उपचार चालू असणाऱ्या ठिकाणी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. भाजपाचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यावेळी हजर होते. त्यांनी पुढील उपचारासाठी पुणे येथील हॉस्पिटलमध्ये संपर्क साधून व्यवस्था करण्याचे काम केले.

Web Title: Former Indapur president Ramesh Jadhav is critically injured in the accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.