शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 22:14 IST

Tanaji Sawant Hospitalized News: तानाजी सावंत यांच्यावर ICUमध्ये उपचार सुरू असून, तूर्तास प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Tanaji Sawant Hospitalized News: शिवसेना शिंदे गटाचे नेते, माजी आरोग्यमंत्री आणि विद्यमान आमदार तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे. तानाजी सावंत यांना पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू असल्याचे सांगितले जात आहे. आमदार तानाजी सावंत यांना दुपारी सुमारे ४.३० वाजता चक्कर येऊन उलटी झाल्यामुळे हृदयाची धडधड वाढली. यावेळी त्रास जाणवू लागल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी हृदयाचा त्रास झाल्यामुळे रुबी हॉल रुग्णालयात तानाजी सावंत यांना दाखल करण्यात आले. आयसीयूमध्ये तानाजी सावंत यांच्यावर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी केलेल्या तातडीच्या उपाचारांमुळे तानाजी सावंत यांची प्रकृती थोडी स्थिर होत असल्याचे सांगितले जात आहे. उद्या तानाजी सावंत यांच्या महत्त्वाच्या वैद्यकीय चाचण्या करण्यात येणार आहेत. यानंतर पुढील उपचारांबाबत निर्णय घेतला जाणार आहे, असे म्हटले जात आहे. तूर्तास तानाजी सावंत यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे.

तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू

रुग्णालयात दाखल होताच आपत्कालीन वैद्यकीय पथकाने तत्काळ त्यांची प्राथमिक तपासणी करून पुढील उपचारांसाठी त्यांना रुग्णालयात दाखल केले. तज्ज्ञ डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या तानाजी सावंत यांची प्रकृती स्थिर असून, त्यांना वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले असल्याची अधिकृत माहिती रुग्णालयाच्या वैद्यकीय संचालकांकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे गटाचे नेते आणि आमदार तानाजी सावंत हे अनेकदा चर्चेत आले आहेत. वाद आणि तानाजी सावंत यांचे नाते कायम असल्याचे अनेकदा पाहायला मिळाले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना तानाजी सावंत आरोग्यमंत्री होते. शिवसेना शिंदे गटाचे मोठे नेते म्हणून तानाजी सावंत परिचित आहेत. तानाजी सावंत मोठे व्यवसायिक असून, त्यांच्या अनेक शैक्षणिक संस्था आहेत.

 

टॅग्स :Tanaji Sawantतानाजी सावंतShiv Senaशिवसेना