शहरं
Join us  
Trending Stories
1
पीडित कुटुंबाला न्याय मिळणार का? 'दीनानाथ'चौकशीप्रकरणी तीनही समित्यांनी केले अहवाल सादर
2
"कुराण आन्...!" NIA कोठडीत दहशतवादी तहव्वुर राणानं मागितल्या या तीन गोष्टी
3
विशाल गवळीची हत्या केली, त्याला फसवलं गेलंय; विशालच्या कुटुंबीयांचा आरोप
4
ताजिकिस्तानात २४ तासांत दोनदा जमीन हादरली; ६.१ रिश्टर स्केलच्या धक्क्यानं लोक घाबरले
5
राज ठाकरेंनी बोलावलं अन् तालुकाप्रमुख बनवलं; बच्चू कडूंची राजकीय एन्ट्री कशी झाली?
6
८ ची सरासरी, ८० चा स्ट्राईक रेट! २७ कोटींची बोली लागलेला रिषभ पंत पुन्हा फ्लॉप, फलंदाजीचा क्रम बदलला पण...
7
बिअर बारमध्ये चोरी, चोरट्यानं दारू पिऊन मालकाला लिहिली चिठ्ठी; वाचणारे झाले भावूक
8
स्वतंत्र बॅरेक, डाएट, रुटीन चेकअप... पतीची हत्या करणाऱ्या मुस्कानला जेलमध्ये स्पेशल ट्रीटमेंट
9
...तरीही आमचा संसार  सुखाचा झाला! सचिन अहिरांच्या प्रेमाची गोष्ट
10
कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून हत्या करणाऱ्या आरोपी विशाल गवळीने संपवलं जीवन, तळोजा कारागृहातील घटना 
11
"तारीख महत्वाची होती...", 'फुले' सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलल्याने प्रतीक गांधीने व्यक्त केली नाराजी
12
"इंडस्ट्रीत लेखक नाही म्हणतात अन् आहे त्याला मानच देत नाहीत", चिन्मय मांडलेकरची खदखद
13
नद्या पाण्याच्या की सांडपाण्याच्या? जलप्रदूषण करणारे घटक येतातच कुठून?
14
युक्रेनमधील भारतीय कंपनीवर रशियाचा हल्ला! २८ देशांसाठी वाईट बातमी; काय होतं उत्पादन
15
मामी-भाच्याची लव्हस्टोरी... दोनदा घरातून पळाले; मामाने अपमान करताच रचला भयंकर कट
16
कुटुंबीयांच्या संमतीने ठरलं तरी जोडप्याने पळून जाऊन केलं लग्न; कारण समजल्यावर व्हाल हैराण
17
..तर आयफोनसाठी खरच किडन्या विकाव्या लागतील? ३ लाखांपर्यंत जाणार किंमत? काय आहे कारण?
18
युक्रेनच्या फाळणीची तयारी...! डोनाल्ड ट्रम्प यांच्या विशेष दुतानं तयार केला प्लॅन; ठेवला धक्कादायक प्रस्तान
19
जामखेडच्या २ मित्रांनी संपवलं आयुष्य; एकाच झाडाला लटकलेले मृतदेह पाहून सगळेच हैराण
20
...म्हणून शेतकरी सावकाराकडे जातो! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसमोर कोणती आव्हानं?

बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी माजी नगरसेवक सुभाष जगताप यांना पत्नीसह अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2018 03:20 IST

पोलिसांनी शुक्रवारी जगताप दाम्पत्याला अटक केली होती. दुपारी त्यांची जामिनावर सुटका झाली.

पुणे : पदाचा गैरवापर करून १ कोटी ३३ लाख ३९ हजार ५९२ रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जमविल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक सुभाष जगताप आणि त्यांच्या पत्नी उषा जगताप यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी दोषारोपपत्र दाखल केले.

पोलिसांनी शुक्रवारी जगताप दाम्पत्याला अटक केली होती. दुपारी त्यांची जामिनावर सुटका झाली. त्यांनी आत्तापर्यंत १ कोटी ३३ लाख ३९ हजार ५९२ रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जमविली असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. जगताप दाम्पत्याविषयी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल झाली होती. त्यानुसार नगरसेवकपदाचा गैरवापर करून बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपावरून ४ मार्च २०१५ रोजी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचे दोषारोपपत्र उपअधीक्षक कांचन जाधव यांनी शुक्रवारी विशेष न्यायाधीश किशोर वढणे यांच्या न्यायालयात दाखल केले. या वेळी सुभाष आणि उषा यांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले.जगताप हे १९९५ ते २०१२ दरम्यान सहकारनगर परिसरात नगरसेवक होते. २०१४ मध्ये त्यांनी विधानसभा निवडणूक लढविली होती. त्यांच्या उत्पन्नाच्या स्रोतापेक्षा त्यांच्याकडे १ कोटी ३३ लाख ३९ हजार ५९२ रुपयांची अधिकची मालमत्ता आढळून आली आहे.तिचा हिशेब त्यांना सादर करता आलेला नाही, असे पोलिसांनी न्यायालयात म्हटले आहे. जगताप यांची उघड, त्यानंतर गुप्त चौकशी झाली होती. जगताप यांच्याविरुद्ध दोषारोपपत्र सादर करण्यासाठी गेल्यावर्षी आॅक्टोबरमध्ये पोलिसांनी राज्य सरकारकडे चौकशी मागितली होती. त्याला गेल्या महिन्यात परवानगी मिळाली. त्यानंतर पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले. 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसPuneपुणे