शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

भिका-यांच्या पुनर्वसनाचा विसर

By admin | Updated: April 4, 2015 06:00 IST

शहरात चौकांचौकांमध्ये, सिग्नलला, रेल्वे स्थानक, बस थांब्यांवर हजारो भिकारी उघडपणे फिरत असताना त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे पुनर्वसन करण्याचा

पुणे : शहरात चौकांचौकांमध्ये, सिग्नलला, रेल्वे स्थानक, बस थांब्यांवर हजारो भिकारी उघडपणे फिरत असताना त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे पुनर्वसन करण्याचा विसर भिक्षेकरी स्वीकार केंद्राला पडलेला आहे. महिला व बाल विकास आयुक्तालयाअंतर्गत लाखो रुपयांचा निधी या केंद्राला दिला जातो. मात्र, गेल्या वर्षभरात केवळ १८० भिकाऱ्यांना ताब्यात घेऊन ११६ जणांचे पुनर्वसन करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सरकारी अनास्थेमुळे केवळ भिक्षेकरी स्वीकार केंद्रांचे अस्तित्व केवळ कागदोपत्रीच असल्याचे दिसत आहे. फाटक्या कपड्यांंमध्ये लहान मुलांना घेऊन भिक मागणाऱ्या महिला, छोटी मुले यांना पाहून अनेकांना त्यांच्याविषयी दयेची भावना निर्माण होते. मात्र, दोन-चार रूपये त्यांच्या वाडग्यात टाकून हळहळत निघून जाण्याशिवाय ते काहीच करू शकत नाहीत. भिकाऱ्यांना वाईट पद्धतीने जगावे लागू नये म्हणून शासनाने सर्व जिल्ह्यांमध्ये भिक्षेकरी स्वीकार केंद्र सुरू केले आहे. महिला व बाल विकास आयुक्तालय तसेच पोलिस यांनी संयुक्तपणे भिकाऱ्यांना ताब्यात घेऊन त्यांचे पुनर्वसन करणे आवश्यक आहे. मात्र, प्रत्यक्षात तसे घडत नसल्याचे लोकहित फाऊंडेशनचे अजहर खान यांना मिळालेल्या माहितीतून निष्पन्न झाले आहे.शहरात १५०० भिकारी कुटुंब आहेत. त्यांच्याकडे नागरिकत्त्वाचा कोणताही पुरावा नसल्याने शासनाच्या योजनेचा लाभ त्यांना मिळू शकत नाही. काही भिकाऱ्यांकडे मोठ्या रकमा आढळून आल्याचे प्रकार उजेडात आले.(प्रतिनिधी)