भंगार व्यावसायिकाकडून जबरदस्तीने उकळली खंडणी; सराईत गुंडाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2021 16:41 IST2021-03-03T16:40:37+5:302021-03-03T16:41:40+5:30
हत्याराच्या जोरावर फिर्यादींच्या खिशातील १२ हजार ३०० रुपये जबरदस्तीने काढून घेतले....

भंगार व्यावसायिकाकडून जबरदस्तीने उकळली खंडणी; सराईत गुंडाला अटक
पुणे : भंगार व्यवसायाच्या येथील कामगारांमध्ये दहशत माजवून व्यावसायिकाच्या खिशातील १२ हजार ३०० रुपये जबरदस्तीने काढून घेणार्या सराईत गुंडाला वानवडीपोलिसांनीअटक केली.
जालिंदरसिंग अजितसिंग कल्याणी (वय ५२, रा. रामटेकडी, हडपसर) असे अटक केलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराचे नाव आहे. त्याचा साथीदार शुभम सातपुते (रा. रामटेकडी, हडपसर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रामटेकडी औद्योगिक परिसरातील रोक्येम ग्रीन एनर्जी या कंपनीजवळ १ मार्च रोजी सायंकाळी साडेपाच व २ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता घडली.
याप्रकरणी रामटेकडीमधील एका व्यावसायिकाने वानवडीपोलिसांकडे फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचा भंगाराचा व्यवसाय आहे. त्यांच्या व्यवसायाच्या येथील कामगारांमध्ये जालिंदरसिंग कल्याणी याने धारदार हत्याराने दहशत माजवली. फिर्यादी यांना भंगाराचा व्यवसाय चालू ठेवायचा असेल तर रोज ६ हजार रुपयांची मागणी केली. हत्याराच्या जोरावर फिर्यादींच्या टी- शर्टच्या खिशातील १२ हजार ३०० रुपये जबरदस्तीने काढून घेऊन गेले. पोलीस उपनिरीक्षक पोटवडे अधिक तपास करत आहेत.