शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी भाजपासह आरपीआयही जोमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2019 12:54 IST

मावळ लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो.

ठळक मुद्दे‘साथी हाथ बढाना’ : महायुतीचे बूधनिहाय नियोजननेत्यांची दिलजमाई, कार्यकर्त्यांचे मनोमिलन गरजेचे

हणमंत पाटील  पिंपरी : मावळ लोकसभा  मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. या ठिकाणी सलग दोन पंचवार्षिक निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले आहेत. मात्र, या निवडणुकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार महाआघाडीकडून रिंगणात उतरल्याने  ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे  यांच्यासाठी महायुतीतील घटक पक्ष असलेले भाजपा व आरपीआय (आठवले गट) यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. गत पंचवार्षिक निवडणुकीत बारणे यांचे प्रतिस्पर्धी असलेले आमदार लक्ष्मण जगताप हे भाजपाचे शहराध्यक्ष आहेत. दोघांमध्ये पारंपरिक वाद आहेत. मात्र, मंत्री गिरीश महाजन यांच्या शिष्टाईनंतर दोघांमध्ये दिलजमाई घडवून आणण्यात आली. त्यानंतर बारणे यांचा उमेदवारीअर्ज भरण्याच्या कार्यक्रमापासून जगताप सक्रीय झाले  आहेत.  मात्र,  जगतापसमर्थक भाजपाचे काही नगरसेवकही केवळ तोंड दाखविण्यापुरते प्रभागातील कोपरा सभा व बैठकांना उपस्थित राहताना दिसत असून, पूर्णपणे सक्रीय नसल्याचे चित्र आहे. पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे महायुतीचे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. त्या ठिकाणीही शिवसेना, भाजपा व रिपब्लिकनचे कार्यकर्ते एकत्र बसून निजोयन करताना दिसतात.भाजपाचे नियोजन बूथनुसार झालेले असल्याने अगोदरपासून काम सुरू करण्यात आल्याचे अमोल थोरात यांनी सांगितले. रिपब्लिकनच्या स्थानिक नेत्या चंद्रकांता सोनकांबळे यांचा आगामी विधानसभा डोळ्यापुढे ठेवून लोकसभेच्या प्रचारात सक्रीय सहभाग दिसून आला. महायुतीतील नेत्यांमध्ये दिलजमाई झाली, आता महायुतीतील कार्यकर्त्यांनाही सक्रीय करण्याचे आव्हान आहे. ..............युतीचा एकदिलाने प्रचार  मावळ लोकसभेच्या प्रचारात महायुतीतील भाजपा, शिवसेना, आरपीआय, रासप असे सर्व मित्रपक्ष एकदिलाने काम करीत आहेत.  - श्रीरंग बारणे, उमेदवार, शिवसेना .........भाजपाचा सक्रियतेचा दावानरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी भाजपाचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीपासून महायुतीच्या प्रचारात सक्रीय आहेत.     - अमोल थोरात, संघटक  सरचिटणीस, भाजपा .............प्रभागनिहाय बैठकांवर भर आमचे नेते रामदास आठवले यांचे आदेश आहेत. त्यानुसार प्रभागनिहाय प्रत्येक १० कार्यकर्त्यांवर जबाबदारी दिली आहे. प्रचारासाठी बैठका, कोपरा सभा सुरू आहेत.    - चंद्रकांता सोनकांबळे, स्थानिक नेत्या, आरपीआय........... सहा विधानसभा मतदारसंघांतील मित्रपक्षांच्या गोटात काय चाललेय? १. पिंपरी : हा शिवसेनेचे आमदार गौतम चाबुकस्वार यांचा मतदारसंघ असून, येथे भाजपाची ताकत वाढली आहे. आरक्षित मतदारसंघात महायुतीच्या प्रचारात भाजपापेक्षा आरपीआय सक्रीय असल्याचे चित्र.२. चिंचवड : या विधानसभेत भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप आहेत. बारणे व जगताप यांची दिलजमाई झाली, तरी मतदारसंघात समर्थकांचे मनोमिलन झाले नसल्याने ते प्रचारात सक्रीय दिसत नाही. ३. मावळ : येथे भाजपाचे आमदार बाळा भेगडे असून, त्यांचे पक्षातील प्रतिस्पर्धी सुनील शेळकेही सक्रीय आहेत. या मतदारसंघात भाजपाचे कार्यकर्ते पुढे आणि शिवसेनेचे नाराज गट प्रचारात मागे दिसून येत आहे.४. पनवेल : येथे भाजपाचे आमदार प्रशांत ठाकूर हे मतदारसंघातील शिवसेनेपेक्षा अधिक सक्रीय आहेत. भाजपाला अधिक मान दिला असल्याने शिवसेनेच्या कार्यकर्त्यामध्ये नाराजी दिसून येत आहे. ५. उरण  : मतदारसंघात शिवसेनेचे आमदार मनोहर भोईर आणि भाजपाचे पदाधिकारी एकत्रितपणे महायुतीचा प्रचार करीत आहेत. येथे महायुतीच्या उमेदवाराला अधिक मताधिक्य देण्याची धडपड दिसत आहे. ६. कर्जत : येथे राष्ट्रवादीचे आमदार सुरेश लाड असूनही गतपंचवार्षिक निवडणुकीत श्रीरंग बारणे यांना मताधिक्य होते. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात पुन्हा आघाडी घेण्याचा महायुतीचा प्रयत्न आहे.  

टॅग्स :mavalमावळmaval-pcमावळLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकVotingमतदानBJPभाजपाShiv Senaशिवसेना