वर्षभरात तिसऱ्यांदा पीएमपीएमएलचा कारभारी बदलला, अध्यक्षपदी आशिष येरेकर यांची नियुक्ती
By भाग्यश्री गिलडा | Updated: July 2, 2024 00:10 IST2024-07-02T00:10:53+5:302024-07-02T00:10:53+5:30
या अगोदर पीएमपीएमएल अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदी डॉ. संजय कोलते हे काम पाहत होते.

वर्षभरात तिसऱ्यांदा पीएमपीएमएलचा कारभारी बदलला, अध्यक्षपदी आशिष येरेकर यांची नियुक्ती
पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपीएमएल) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून आशिष येरेकर (भाप्रसे) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या अगोदर पीएमपीएमएल अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदी डॉ. संजय कोलते हे काम पाहत होते.
सतरा वर्षांत बदलले २२ अध्यक्ष
आर. एन. जोशी वगळता इतर कोणत्याही अधिकाऱ्याला पीएमपीएमएलमध्ये त्यांच्या सेवेचा कार्यकाळ पूर्ण करता आला नाही. गेल्या १७ वर्षांत या कंपनीच्या प्रमुखपदी २१ माणसे येऊन गेली, सोमवारी (दि. १) २२ व्या अधिकाऱ्याची नियुक्ती केल्याचा आदेश काढण्यात आला. त्यामुळे इतक्या मोठ्या संस्थेला कामकाज करण्यासाठी पीएमपीएमएलला पूर्णवेळ अध्यक्ष नियुक्त करणे राज्य सरकारला फारसे जमलेले नाही. याचा परिणाम पीएमपीच्या सेवा- सुविधांवर होत असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे.