शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊन काळातले 'अन्नदाते'; पुणे शहरातील भुकेलेल्यांच्या पोटाला मिळतोय दोन घासांचा आधार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2020 14:31 IST

पोलिसांचा नियमित जाच सहन करूनही करतात पुण्यकर्म..

ठळक मुद्देविद्यार्थी, स्वयंपाक करू न शकणाऱ्या अनेक वृद्धांंना त्याचा उपयोग दोन पोळ्या, सुकी भाजी, आमटी, भात असे एकवेळचे जेवण ५० ते ७० रूपयांपर्यंत

राजू इनामदारपुणे: कोरोना टाळेबंदीत पोलिसांचा जाच सहन करूनही शहरातील काही खानावळचालक गरजवतांना नियमित जेवण देण्याचे काम करत आहेत. विद्यार्थी, स्वयंपाक करू न शकणाऱ्या अनेक वृद्धांंना त्याचा उपयोग होत आहे. पुण्यात स्पर्धा परीक्षांसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या काही हजारात आहे. पेईंग गेस्ट म्हणून ते रहात असतात. टाळेबंदीत त्यांच्यातील अनेक जण पुण्यातच अडकले. त्याशिवाय घरी स्वयंपाक करता येत नाही असे व्रुद्धही अनेक आहेत. अशा सर्वांची दोन वेळच्या जेवणाची सोय करणार्या अनेक खानावळी पुण्यात आहेत.बहुसंख्य खानावळी या घरगुती असून महिलांकडूनच चालवल्या जातात. टाळेबंदीतही आपल्या सदस्यांची गरज म्हणून त्यांच्यातील काहींनी खानावळ सुरू ठेवली आहे.डबा भरून देणे किंवा मग जागा असेल तर टेबल खुर्ची टाकून तिथेच व्यवस्था करण्यात येते. दोन पोळ्या, सुकी भाजी, आमटी, भात असे एकवेळचे जेवण ५० ते ७० रूपयांपर्यंत मिळते. दोन वेळच्या जेवणाचे दरमहाचे अनेक ग्राहक या खानावळ चालकांकडे आहेत. मागील अनेक वर्षांपासून हा व्यवसाय सुरू असून त्यातल्या काही खानावळी तर २५ ते ३० वर्षांपासूनच्या आहेत. शिक्षण, नोकरी, व्यवसाय या निमित्ताने पुण्यात रोज येणार्यांची, त्यातल्या इथेच राहणार्यांची संख्या काही लाखात आहे. त्यातल्या काही हजारांची जेवणाची सोय याच खानावळींमधून होत असते.कोरोना टाळेबंदीची कुऱ्हाड याही व्यवसायावर कोसळली. त्यांचाही व्यवसाय बंद झाला, मात्र त्यामुळे त्यांच्या जेवणावर अवलंबून असलेल्यांची ऊपासमार होऊ लागली. त्यामुळे अनेक महिलांंनी आपला व्यवसाय पुन्हा सुरू केला. दत्तवाडीतच अशा चार खानावळी आहेत. विद्यार्थी वर्ग राहण्याचे प्रमाण नवी पेठ, दांडेकर पूल या भागात जास्त आहे. तिथेही अशा खानावळी आहेत. त्याशिवाय कर्वे रस्ता परिसरातही काहींनी डबा देण्याचे काम सुरू ठेवले आहे.यातल्या बहुतेकांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी त्यांचे दर वाढवलेले नाहीत. टाळेबंदीच्या आधी होते तेच दर कायम ठेवले आहेत. 

दर जूनेचटाळेबंदीत धान्य, रोजचा भाजीपाला यांचे भाव वाढले, मात्र आमचे मेंबर नेहमीचे असल्याने आम्ही दर वाढवले नाहीत. घरचेच लोक स्वयंपाक करत असल्याने मजूरी द्यावी लागत नाही. त्यामुळे परवडते.अमित माने, श्रावणी खानावळ ----/गरजूंची भूक भागवण्यात आनंदपोलिसांचा त्रास होतो, पण त्यापेक्षा गरजूंना डबा देता येतो याचा आनंद जास्त आहे. अनेकांची अडचण असते. वयामुळे स्वयंपाक होत नाही. त्यांंना आम्ही नियमीत डबा देतो. -- शंकर गिरी. बालाजी खानावळ..........//खानावळीमुळेच राहणे शक्यमी रहायला देहूरोडला आहे. अभ्यासासाठी म्हणून पुण्यात एकटाच राहतो आहे. खानावळ सुरू असल्यामुळेच इथे एकटे राहणे शक्य होत आहे.-- ऊदय महाले, विद्यार्थी...../(३२७)

 

टॅग्स :Puneपुणेfoodअन्नcorona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिसStudentविद्यार्थी