कोरोनामुळे जगणं झालं कठीण! अन्न-धान्य व जवळील पैसे संपलेत....तृतीय पथीयांची समाजाला हाक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 07:47 PM2020-03-24T19:47:05+5:302020-03-24T19:49:57+5:30

समाज बांधवांनो आमच्यासाठीही काही तरी कोरोना अशी आर्त हाक या तृतीय पंथी बांधवांनी दिली.

Food and grain are almost gone, something for us; transgender request | कोरोनामुळे जगणं झालं कठीण! अन्न-धान्य व जवळील पैसे संपलेत....तृतीय पथीयांची समाजाला हाक

कोरोनामुळे जगणं झालं कठीण! अन्न-धान्य व जवळील पैसे संपलेत....तृतीय पथीयांची समाजाला हाक

googlenewsNext
ठळक मुद्दे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व प्रतिबंधात्मक उपाय योजना

अन्न-धान्य व जवळील पैसे संपलेत, आमच्यासाठीही काहीतरी कोरोना - तृतीय पंथी यांची समाजाला हाक
वाकड : कोरोणाच्या प्रादुभार्वामुळे सगळेच त्रस्त आहेत. सरकारने संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे बाजारपेठा, दुकाने बंद आहेत, रस्ते ओस पडले आहेत. त्यामुळे या सवार्चा मोठा फटका हातावर पोट असलेल्या व समाजात नेहमीच दुर्लक्षित व उपेक्षित राहिलेल्या तृतीयपंथीयांना बसत आहे. मागून आणलेले अन्न-धान्य व पैसे संपल्याने मोठी आभाळ सुरू आहे. आता समाज बांधवांनो आमच्यासाठीही काही तरी कोरोना अशी आर्त हाक या बांधवांनी दिली आहे.

        कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यासाठी अनेक समाजसेवक, राजकारणी,  महापालिका प्रशासन, सेवाभावी संस्था पुढे सरसावल्या आहेत. काहीजण मास्क वाटत आहेत तर काहीजण औषध फवारणीत गुंग आहेत. मात्र, आमच्या सारख्या तृतीयपंथी समाजाकडे या सर्वांनी मात्र सपशेल पाठ फिरवली आहे. ना आम्हाला कोणी मास्क वाटले, ना कोणी येऊन फवारणी केली हे सगळं जाऊ द्या. आता मात्र आमच्या टीचभर पोटाची ईतभर खळगी भरणं मुश्किल झाल्याने आम्ही सर्वजण तुमच्याकडे आशेने पाहतो आहोत, अशी आर्त साद घातली आहे.

तृतीय पंथीयांसाठी काम करणाऱ्या व निर्भया आनंदीजीवन संस्थेच्या अध्यक्षा चांदणी गोरे यांनी समाज माध्यमाद्वारे समाजापुढे तृतीयपंथीयांची ही व्यथा, हे वास्तव मांडले आहे.आम्हीही समाजाचा एक घटक आहोत, आपलेच बांधव आहोत म्हणून मी आपल्याला आवाहन करते की ज्याप्रमाणे आर्थिक दुर्बल घटकातील गोर गरिबांना काही समाजसेवी संस्था, देवस्थान कडून अन्नधान्याची मदत केली जाते.  आठवडाभर पुरेल एवढ्या अन्न-धान्याचा पुरवठा मदत म्हणून दिली जाते त्याचप्रमाणे प्रत्येकाने आपल्या घराजवळच्या तृतीयपंथी बांधवांना दहा दिवस पुरेल एवढं अन्न-धान्य तेल, मीठ, साखर, मसाले अशा जीवनावश्यक वस्तू देऊन आमच्या पोटाचा प्रश्न सोडवावा अशी विनंती गोरे यांनी केली आहे.

-----------------------------------------------
समाजाने लक्ष देण्याची गरज

पैसे मागणे, यात्रा, उत्सवामध्ये तसेच ऑर्केस्ट्रामध्ये डान्स करणे यातून ज्या समाजाच्या आधारे आम्ही या समाजातच स्वत:चा उदरनिवार्हाचा मार्ग शोधला आहे मात्र आता आम्ही पूर्णपणे हतबल झालो असून आपल्या मदतीच्या आधारे या संकटांला सामोरे जाऊ अशी अपेक्षा असल्याने समाजाने आमच्याकडे लक्ष द्यावे. निकिता मुख्यदल (वाल्हेकर वाडी, चिंचवड)-

Web Title: Food and grain are almost gone, something for us; transgender request

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.