शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

ही परदेशातली नदी नाही बरं का आपली मुळा मुठाच आहे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2019 14:13 IST

सांडपाण्यामुळे मुळा-मुठा नदीमध्ये फेस : नागरिकांचे आरोग्य धोक्यात

ठळक मुद्देपुरामुळे स्वच्छ झाल्यानंतर पुणे, चिंचवडचा मैला थेट नदीपात्रात आता मुठा नदीकाठी असणाऱ्या डीपी रस्त्यावरील बांधकामे पाडण्याचा आदेश कोणत्याही शहरातून वाहणारी नदी ही केवळ त्या शहराची जीवनवाहिनी पुणे महापालिकेच्या वतीने ९ ठिकाणी मैलापाणी शुद्धीकरण केंद्रे

लोणी काळभोर : पावसाने या वर्षी लावलेल्या दमदार हजेरीमुळे मुळा- मुठेला अनेकदा पूर आला. यामुळे नदीतील जलपर्णी, घाण आणि दूषित पाणी वाहून गेले. यामुळे नदीकाठच्या ग्रामस्थांत आनंदाचे वातावरण होते. मात्र, पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथील रसायने आणि मैलायुक्त दूषित पाणी पुन्हा नदीत आल्याने या दोन्ही नद्यांचे पाणी पुन्हा दूषित झाले आहे.   ज्या गावची नदी स्वच्छ, त्या गावाचे आरोग्य चांगले, असे आयुर्वेदात सांगितले आहे. मुळा-मुठा नदी हीसुद्धा त्याला अपवाद नाही. पानशेत पुरानंतर नदीचे पाणी आसपासच्या भागात कुठवर जाते, याची कल्पना आल्यानंतर किमान तो भाग मोकळा करणे पालिकेला शक्य होते. तेथील सर्व बेकायदा अतिक्रमणे हटवणेही गरजेचे असताना तसे घडले नाही. उलट, तेथील वस्त्या आहे तिथेच राहिल्या. नदीत बांधकामांचा राडारोडा टाकणाऱ्यांचे प्रमाणही वाढत गेले. त्यावर कोणाचाच वचक राहिलेला नाही.मध्यंतरी नदीपात्रातून जाणाऱ्या रस्त्याला राष्ट्रीय हरित लवादाने आक्षेप घेतल्यावर तो काढून टाकावा लागला. याच लवादाने आता मुठा नदीकाठी असणाऱ्या डीपी रस्त्यावरील बांधकामे पाडण्याचा आदेश दिल्यामुळे पुणे महापालिका प्रशासन आणि पाटबंधारे विभागाला त्याची दखल घ्यावी लागली आहे. न्यायालयाचा बडगा आल्याशिवाय आपल्याकडे कोणतेही काम सरकारी पातळीवर होत नाही, हा अनुभव आजच्या स्मार्ट सिटीच्या काळातही येत आहे.कोणत्याही शहरातून वाहणारी नदी ही केवळ त्या शहराची जीवनवाहिनी नाही, तर आरोग्याचे रक्षण करणारी सरिता समजली जाते. कारण, मुळा-मुठा नदीचे गटारगंगेत झालेले रूपांतर हे पुणे शहर व नदीनजीकच्या गावांतील नागरिकांच्या आरोग्याबाबतच्या वाढत्या तक्रारींमागील एक महत्त्वाचे कारण आहे, हे सिद्ध झाले आहे. या नदीकडे गेल्या पाच-साडेपाच दशकांत दुर्लक्ष झाले असल्यामुळे तिची व तिच्या आसपासची परिस्थिती बिकट झाली आहे. मैलायुक्त पाणी शिरल्यामुळे नदीतील अनेक जलचर प्रजाती नष्ट झाल्या आहेत. .... उजनी धरणातही दूषित पाणीपुणे महापालिकेच्या वतीने ९ ठिकाणी मैलापाणी शुद्धीकरण केंद्रे उभारली आहेत. परंतु, ती नावालाच असल्याने पाणी जसेच्या तसे नदीत येते. ग्रामीण भागातील शेतकरी याच पाण्याचा उपयोग शेतीसाठी करतात. पुढे हेच पाणी उजनी धरणातून थेट सोलापूर जिल्ह्यात जाते...........

नदीतीरावर असलेल्या गावांतील नागरिक हे पाणी पिण्यासाठी वापरतात. यामुळे त्यांना काहीच दोष नसताना गॅस्ट्रो, विषमज्वर, कॉलरा इत्यादी आजारांसह पोटाच्या विविध समस्यांना सामोरे जावे लागते.

3यामुळे ‘पिंपरी-चिंचवड व पुण्याच्या चुकांची शिक्षा आम्ही का भोगायची?’ असा सवाल ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांचा आहे. ...

टॅग्स :Puneपुणेmula muthaमुळा मुठाriverनदीpollutionप्रदूषणenvironmentपर्यावरण