शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात कोरोनामुळे कोमजलेला फुल बाजार गणेशोत्सवामुळे फुलला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2020 11:46 IST

फुलांची आवक आणि ग्राहकांची गर्दी वाढली

ठळक मुद्देपुणे जिल्ह्यातून गुलाब, शेवंती, गुलछडी, अष्टर या फुलांची आवक फुलबाजारात कर्नाटक, सातारा, सोलापूर, बीड भागातून बाजारात झेंडूच्या फुलांची आवक

पुणे : कोरोनाच्या संकटामुळे आणि लाॅकडाऊनमध्ये तीन महिने बंद असलेला फुल बाजार अनलाॅकमध्ये सुरू झाला. परंतु सर्व धार्मिक स्थळे व जाहिर कार्यक्रम बंद असल्याने फुलांना अपेक्षित मागणीच नव्हती. परंतु आता आपल्या लाडक्या बाप्पाच्या अगमनासाठी बाजार पेठा सज्ज झाल्या आहेत. यामुळेच फुलांना देखील मागणी वाढली असून, कोरोनामुळे कोमजलेला फुल बाजार चांगलाच फुलला आहे. गुरूवारी फुल बाजारात फुलांची आवक चांगलीच वाढली होती व ग्राहकांची देखील खरेदीसाठी गर्दी केली. 

सध्या सर्वांच्या लाडक्या बाप्पाच्या अगमनास अवघे काही तास उरले आहेत. गणेशोत्सवामुळे मंदिराची सजावट, विविध प्रकारचे हार, माळा आदींसाठी ग्राहकांकडून फुलांना मोठी मागणी असते. त्यामुळेच मार्केटयार्डातील फुल बाजारात फुलांची आवक वाढली आहे. खरेदीसाठी विक्रेते आणि ग्राहकांची संख्या वाढली आहे. अचानक आवक वाढल्याने गुरूवारी फुलबाजार बहरला.कोरोनामुळे मार्च, एप्रिल आणि मे जुन या महिन्यात फुलबाजार बंदच होता. मागील महिन्यांत फुल बाजार सुरू झाला आहे. मात्र शहरातील मंदिरे आणि धार्मिक स्थळे बंद असल्याने फुलांची आवक होत नव्हती. तसेच ग्राहकांकडूनही अधिकची मागणी होत नव्हती. मात्र गणेशोत्सवामुळे विविध प्रकारच्या फुलांची आवक वाढली आहे. खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडत असल्याची माहिती व्यापारी सागर भोसले यांनी दिली. फुलबाजारात कर्नाटक, सातारा, सोलापूर, बीड भागातून बाजारात झेंडूच्या फुलांची आवक झाली.

पुणे जिल्ह्यातून गुलाब, शेवंती, गुलछडी, अष्टर या फुलांची आवक झाली. कोरोनामुळे फुलांची आवक दरवर्षीच्या तुलनेत कमी आहे. दरवर्षी गणेशोत्सवात फुलांची मोठी आवक होते. मात्र, फूल बाजाराचे कामकाज नियमित झाल्यानंतर पहिल्यांदाच काल फुलांची मोठी आवक झाली असल्याचेही भोसले यांनी नमुद केले. झेंडूच्या फुलांना ग्राहकांकडून चांगली मागणी आहे. झेंडूच्या फुलांना प्रतवारीनुसार प्रतिकिलोला 100 ते 200 रुपये भाव मिळाला. शेवंतीला प्रतिकिलो 100 ते 200 रुपये, गुलछडीला 300 ते 400 रुपये भाव मिळाला. अष्टरच्या चार गड्ड्यांना 50 रुपये तसेच साध्या गुलाबाच्या गड्डीला 30 ते 60 रुपये आणि डच गुलाबाच्या गड्डीला 100 ते 160 रुपये भाव मिळाला. गौरी विसर्जनापर्यंत फुलांचे दर तेजीत राहणार असल्याचेही सागर भोसले यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेMarket Yardमार्केट यार्डGanesh Mahotsavगणेशोत्सवCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस