नीरा नदीला पूरस्थिती
By Admin | Updated: August 4, 2014 23:29 IST2014-08-04T23:29:56+5:302014-08-04T23:29:56+5:30
पुरंदर तालुक्यातील वीर धरण शंभर टक्के भरल्याने वीर धरणाचे आज सोमवारी पुन्हा 3 दरवाजे 4 फुटाने उघडून नीरा नदीपात्रत प्रतिसेकंद 15 हजार क्युसेक्स इतक्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला.

नीरा नदीला पूरस्थिती
नीरा : पुरंदर तालुक्यातील वीर धरण शंभर टक्के भरल्याने वीर धरणाचे आज सोमवारी पुन्हा 3 दरवाजे 4 फुटाने उघडून नीरा नदीपात्रत प्रतिसेकंद 15 हजार क्युसेक्स इतक्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. वीर धरण पाणलोट क्षेत्रत आजअखेर अल्प प्रमाणावर केवळ 217 मि. मी. पाऊस झाला आहे. वीर धरणामध्ये सद्या 9 हजार 835 दशलक्ष घनफूट इतका
1क्क् टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. दरम्यान, वीर धरणावरील वीजनिर्मिती प्रकल्पामध्ये
बिघाड झाल्याने हा वीजनिर्मिती प्रकल्प सद्या बंद पडल्याने वीजनिर्मिती थांबली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
नीरा-देवघर धरणामध्ये 88 टक्के, तर भाटघर धरणामध्ये 71 टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. नीरा-देवघर आणि गुंजवणी धरणाच्या पाणलोट क्षेत्रत काल पाऊस झाल्याने वीर
धरणाच्या पाणीसाठय़ात गतीने वाढ झाली. त्यामुळे यंदा नीरा खो:यातील वीर धरणातून दुस:यांदा
नीरा नदीपात्रत पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याने नीरा
नदीला पूरस्थिती निर्माण होऊ लागली आहे.
वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रत नीरा-देवघर आणि गुंजवणी धरणाच्या पाणलोट क्षेत्रतून गेल्या काही दिवसांपासून पावसाचे पाणी येत आहे.
परिणामी, धरण क्षेत्रत अल्प प्रमाणावर पाऊस होऊनसुद्धा प्रामुख्याने गुंजवणी धरणातून गेल्या काही दिवसांपासून सातत्याने येणा:या पाण्यामुळे वीर धरणाची पातळी वाढली. नीरा- देवघर धरणाच्या परिसरात आजअखेर 149क् मि. मी., भाटघर धरण क्षेत्रत 515 मि. मी., तर गुंजवणी परिसरात 1326 मि. मी., वीर धरण परिसरात 217 मि. मी. इतक्या प्रमाणात पाऊस झाला आहे.
दरम्यान, वीर धरणातून नीरा नदीपात्रत पाणी सोडल्याने नीरा नदीला पूरस्थिती निर्माण होऊ लागली आहे. नीरा नदीकाठच्या गावांना जलसंपदा खात्याच्या वतीने नीरा येथील सहायक अभियंता दिगंबर डुबल यांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे.
भाटघर, नीरा-देवघर आणि गुंजवणीच्या परिसरात
पाऊस ओसरला, तर वीरमधून नीरा नदीपात्रत होणारा विसर्ग कमी करण्यात येणार असल्याचा अंदाज वीर धरणाच्या सूत्रंनी व्यक्त केला आहे. (वार्ताहर)
4आज संध्याकाळर्पयत नीरा-देवघर धरणात 9 हजार 373 दशलक्ष घनफूट इतका 87. 33 टक्के, तर भाटघर धरणात 16 हजार 9क्8 दशलक्ष घनफूट इतका 7क्.88 टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.
4नीरा डावा कालव्यामध्ये प्रतिसेकंद 827 क्युसेक्स, तर नीरा उजव्या कालव्यामध्ये 1 हजार 55क् क्युसेक्सया प्रमाणात वीर धरणातून पाणी सोडले जात आहे.
4यंदा वीर धरणात 1क्क् टक्के पाणीसाठा उपलब्ध झाल्याने आज सकाळी 7 वाजता धरणाचे तीन दरवाजे 4 फुटाने उघडून नीरा नदीपात्रत 15 हजार क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग करण्यात आला.