दक्षिण पुण्यात पूर, आंबील ओढ्याची मिठी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2019 07:29 IST2019-09-26T07:25:53+5:302019-09-26T07:29:24+5:30

पुण्यात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे.

Flood in South Pune | दक्षिण पुण्यात पूर, आंबील ओढ्याची मिठी

दक्षिण पुण्यात पूर, आंबील ओढ्याची मिठी

पुणे - पुण्यात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. पुण्यातील आंबील ओढ्याच्या पाण्याच्या मिठीने दक्षिण पुण्यात बुधवारी रात्री मोठा पूर आला. या पुरात अनेक कच्ची घरे कोसळली असून, रस्त्यांवर आणि घरांमध्ये पाणी शिरलं आहे. अरण्येश्वर येथील टांगेवाले कॉलनीमध्ये भिंत कोसळून दहा जणांचा मृत्यू झाला. अरण्येश्वर  भागात वाहणाऱ्या आंबिल ओढ्याला कात्रज परिसरातील पावसाने झोडपून काढलं. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात पूरस्थिती निर्माण झाली. सतत कोसळत असलेला पाऊस आणि ओढ्याचा पूर यामुळे आसपासच्या वस्त्यांत पाणी घुसले. पाण्याच्या दाबामुळे घरांच्या भिंती पडल्या. शेकडो गाड्या ओढ्यात वाहून गेल्या असून, यामध्ये चारचाकी, दुचाकी गाड्याचा समावेश आहे.

Web Title: Flood in South Pune