बिघाडामुळे विमानाचे उड्डाण रद्द
By Admin | Updated: October 18, 2014 01:47 IST2014-10-18T01:47:25+5:302014-10-18T01:47:25+5:30
गुरुवारी रात्री पुण्याहून दिल्लीला जाणारे विमान इंजिनामध्ये झालेल्या बिघाडामुळे शुक्रवारीही उड्डाण करू शकले नाही. त्यामुळे प्रवाशांनी विमानतळावर प्रचंड गोंधळ घातला.

बिघाडामुळे विमानाचे उड्डाण रद्द
पुणो : गुरुवारी रात्री पुण्याहून दिल्लीला जाणारे विमान इंजिनामध्ये झालेल्या बिघाडामुळे शुक्रवारीही उड्डाण करू शकले नाही. त्यामुळे प्रवाशांनी विमानतळावर प्रचंड गोंधळ घातला. परंतु याची साधी दखलही विमानतळ अधिका:यांनी घेतली नाही.
एअर इंडियाचे फ्लाय एआय 854 हे विमान गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास दिल्लीसाठी उड्डाण करणार होते. त्याचवेळी अधिका:यांनी प्रवाशांना विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती दिली. गुरुवारी रात्री बारार्पयत हे विमान दुरुस्त होईल असे आश्वासन देण्यात आले होते. परंतु शुक्रवारी रात्री उशिरार्पयत दुरुस्ती झालेली नव्हती अशी माहिती प्रवाशांनी दिली.
प्रवासी असलेले एमपी ग्रुपचे संचालक आनंद रेगी यांनी ‘लोकमत’ दिलेल्या माहितीनुसार, विमानाच्या इंजिनामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे सांगण्यात आले होते. रात्री बारा वाजता आणखी वेळ लागणार असल्याचे सांगण्यात आले. रात्री साडेतीन वाजेर्पयत बसवून ठेवल्यानंतर शुक्रवारी दुपारी बारा वाजता विमान उड्डाण करेल असे सांगून घरी जाण्यास सांगण्यात आले.
शुक्रवारी दुपारी सर्व प्रवासी पुन्हा विमानतळावर गेले तेव्हा त्यांना विमानात बसण्यासाठी सांगण्यात आले. बराच वेळ विमानात बसल्यानंतर दीडच्या सुमारास विमानाने धावपट्टीवर धावण्यास सुरुवात केलीच होती की पुन्हा इंजिनामधून आवाज आला. प्रवाशांच्या हाती शेवटी निराशाच पडल्याचे जितेंद्र कुमार यांनी सांगितले. इंजिनामधून जोरात आवाज आल्यामुळे सगळे प्रवासी घाबरले. त्यानंतर पुन्हा सर्वाना खाली उतरवण्यात आले. यासोबतच दिल्लीवरुन दुसरे विमान मागवण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. परंतु ते विमानही अद्याप पुण्यात पोचलेले नाही. (प्रतिनिधी)
च्पुणो विमानतळाचे संचालक मनोज गांगल यांनी ‘लोकमत’ जवळ खेद व्यक्त केला. प्रवाशांना त्रस झाला त्याबद्दल आपल्याला खेद असून याबाबत एअर इंडियाच्या क्षेत्रिय संचालकांना माहिती दिली आहे. त्यांनी ठोस पावले उचलण्याचे आश्वासन दिल्याचे गांगल यांनी सांगितले.