flag hosting with the hands of gay couple ; progressive step in pune | समलिंगी जाेडप्याच्या हस्ते ध्वजाराेहण ; पुण्यातील पुराेगामी पाऊल

समलिंगी जाेडप्याच्या हस्ते ध्वजाराेहण ; पुण्यातील पुराेगामी पाऊल

पुणे : देशभरात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा हाेत असताना पुण्यात लाेकाशाही उत्सव या कार्यक्रमामध्ये पुराेगामी पाऊल उचलण्यात आले. प्रजासत्ताक दिनी पुण्यातील एस एम जाेशी फाऊंडेशनच्या प्रांगणामध्ये समलिंगी जाेडप्याच्या हस्ते ध्वजाराेहण करण्यात आले. या उपक्रमातून संविधानाचे तसेच लाेकशाहीचे महत्त्व अधाेरेखित करण्यात आले. 

पुण्यातील एस एम जाेशी सभागृहात लाेकशाही उत्सव 2019 या कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले आहे. 26 जानेवारी ते 30 जानेवारी दरम्यान हाेणाऱ्या या उत्सवात विविध कार्यक्रमांचे आयाेजन करण्यात आले आहे. विविध व्याख्यान, नाटक, पथनाट्ये या महाेत्सवात सादर केली जाणार आहेत. 26 जानेवारी राेजी या उत्सवात एक पुराेगामी पाऊल टाकण्यात आले. पुण्यातील समलिंगी जाेडपे समीर समुद्र आणि अमित गाेखले यांच्या हस्ते ध्वजाराेहन करण्यात आले. 

आज प्रजासत्ताक दिनी आम्हाला ध्वजाराेहणाचा मान देण्यात आला याचा आनंद यावेळी या जाेडप्याने व्यक्त केला. या उपक्रमातून खऱ्या अर्थाने हा लाेकशाहीचा उत्सव असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: flag hosting with the hands of gay couple ; progressive step in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.