शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
3
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
4
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
5
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
6
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
7
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
8
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
9
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
10
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
11
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
12
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
13
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
14
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
15
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
16
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
17
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
18
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
19
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
20
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर

हॉटेल-रुग्णालयांसाठी ‘फाइव्ह स्टार’ सवलती

By admin | Updated: November 20, 2014 04:25 IST

महापालिकेने अगोदरच शहरातील काही प्रथितयश ‘फाइव्ह स्टार’ हॉस्पिटलवर वाढीव चटई क्षेत्र निर्देशांकाची (एफएसआय) खैरात केली आहे

हणमंत पाटील, पुणेमहापालिकेने अगोदरच शहरातील काही प्रथितयश ‘फाइव्ह स्टार’ हॉस्पिटलवर वाढीव चटई क्षेत्र निर्देशांकाची (एफएसआय) खैरात केली आहे. मात्र, या हॉस्पिटलमध्ये गोरगरीब रुग्णांना दाखल करून घेतले जात नसल्याच्या तक्रारी आहेत. तरीही शहरातील नव्याने प्रस्तावित आणखी काही ‘फाइव्ह स्टार’ हॉस्पिटल व हॉटेलच्या उभारणीसाठी प्रिमीयममध्ये सवलती देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे ऐनवेळी दाखल झाला आहे. सध्या पालिकेने शहरात रुबी, सह्याद्री, औंध व इनलॅक्स हॉस्पिटलला वाढीव ‘एफएसआय’ची सवलत दिली आहे. धर्मादाय आयुक्तांकडूनही सर्व हॉस्पिटलला सवलत दिली जाते. त्या बदल्यात संबंधित हॉस्पिटलमध्ये शहरातील गरीब रुग्णांसाठी १० टक्के खाटा राखीव ठेवणे अपेक्षित आहे. मात्र, माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीमध्ये गेल्या तीन वर्षांत महापालिकेने दिलेल्या वाढीव ‘एफएसआय’नुसार १० टक्केप्रमाणे ३० हजार गरीब रुग्णांवर उपचार होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात १५० रुग्णांवर उपचार झाल्याचा गंभीर प्रकार पुढे आला आहे. त्यामुळे महापालिकेकडून फाइव्ह स्टार हॉस्पिटलला दिल्या जाणाऱ्या सवलतींचा फायदा गरीब रुग्णांऐवजी संचालकांना मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे. तरीही शहरातील काही नव्याने प्रस्तावित फाइव्ह स्टार हॉस्पिटल व हॉटेल डोळ्यांपुढे ठेवून काँग्रेसच्या दोन नगरसेवकांनी त्यांना सवलतीचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे ११ नोव्हेंबरला ऐनवेळी दाखल केला. सद्य:स्थितीत महापालिकेच्या नियमानुसार फाइव्ह स्टार हॉटेल व हॉस्पिटलचे जिने, लिफ्ट व लॉबिजला रेडीरेकनरनुसार प्रिमीयम आकारला जातो. त्यामुळे नवीन रुग्णालये व हॉटेल वाढण्यास मर्यादा येत आहेत. एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात रुग्णालयातील खाटांची संख्या ५००० इतकी कमी आहे. तसेच, नव्याने रुग्णालय उभारणे आणि चालविणे खर्चिक होत असून, तोटा वाढत चालला आहे, अशी बाजू प्रस्तावात संबंधित सदस्यांनी मांडली आहे.