शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

मुळशी तालुक्यामध्ये दुर्दैवी घटनेत पाण्यात बुडून एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 17:21 IST

मुळशी तालुक्यामधील कोळवन जवळ असलेल्या वाळेन गावामध्ये दुर्दैवी घटना घडली असून या घटनेमध्ये वळकी नदीच्या डोहामध्ये बुडून एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झालेला आहे.

पिरंगुट : मुळशी तालुक्यामधील कोळवन जवळ असलेल्या वाळेन गावामध्ये दुर्दैवी घटना घडली असून या घटनेमध्ये वळकी नदीच्या डोहामध्ये बुडून एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झालेला आहे.वळकी नदीच्या डोहामध्ये धुणे धुण्यासाठी गेलेल्या महिलेसह तिच्या तीन मुली आणि तिच्या पतीसह अशा एकाच कुटुंबातील पाच जणांचा पाण्यात बुडून दुर्दैवी रित्या मृत्यू झाला आहे.

पौड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोळवण जवळील वाळेण गावामध्ये दुर्दैवी घटना घडली असून या घटनेमध्ये शंकर दशरथ लायागुडे (वय.३८ वर्ष),पौर्णिमा शंकर लायगुडे ( वय.३६ वर्ष),अर्पिता शंकर लायगुडे ( वय.२० वर्ष), अंकिता शंकर लायगुडे ( वय १३ वर्ष) आणि राजश्री शंकर लायगुडे ( वय.१२ वर्ष ) यांचा वळकी नदीतील डोहामध्ये असलेल्या पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे तर हे सर्वजण वाळेन ता,मुळशी जि.पुणे येथील रहिवासी आहेतया बाबतीत सविस्तर वृत्त असे की सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास वाळेन गावातील वळकी नदीच्या डोहामध्ये कपडे धुण्यासाठी पौर्णिमा लायगुडे ह्या महिला गेल्या होत्या.तेव्हा कपडे धुवत असताना पौर्णिमा यांचा पाय घसरल्याने त्या पाण्यात पडल्या.तेव्हा त्यांना वाचविण्यासाठी त्यांच्या जवळ असलेल्या तीन ही मुली पाण्यामध्ये  गेल्या.पण या मध्ये  कोनालाच पोहता येत नसल्याने हे सर्व जण पाण्यात बुडायला लागले होते.तेव्हा हा सर्व प्रकार पोर्णिमाचे पती व त्या मुलींचे वडील शंकर लायगुडे यांनी पहिला व या सर्वांना वाचविण्यासाठी त्यांनी तात्काळ पाण्यात उडी मारली.परंतु दुर्दैवाने त्यांना सुध्दा पोहता येत नसल्याने एकमेकांना वाचविण्याच्या प्रयत्नात दुर्दैवी रित्या या पाच ही जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.

तर या घटनेची माहिती मुळशी आपत्ती व्यवस्थापन समितीला कळताच हे पथक या ठिकाणी तात्काळ आले व त्यांनी येऊन पाण्यातील पाचही जणांचे मृतदेह पाण्याच्या बाहेर काढले असून पुढील तपासणीसाठी हे सर्व मृतदेह पौड येथील ग्रामीण रूग्णालयात पाठविण्यात आले आहेत.तर या घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण वाळेण गावामध्ये हळहळ व्यक्त केली जात असून संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

या घटनास्थळी पौड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ,सहाय्यक पोलिस निरीक्षक भालचंद्र शिंदे,पोलिस मृगदीप गायकवाड,पोलिस विजय कांबळे,आपत्ती व्यवस्थापनचे प्रमोद बलकवडे उपस्थित होते. 

टॅग्स :Puneपुणे