पुणे : दिवाळी म्हटले की दिव्यांनी उजळून टाकणारा आसमंत, सर्वत्र चैतन्याची लहर, खमंग फराळाचा सुवास अन् स्वरांची मेजवानी असा अनुभव पुणेकरांसहपिंपरी-चिंचवडकरांना घेता येणार आहे. लोकमत आयोजित ‘स्वरचैतन्य दिवाळी पहाट’ यंदा बालेवाडी, पुणे, हडपसर, सातारा रस्ता आणि चिंचवड अशा पाच ठिकाणी होणार असून शहरातील रसिकांसाठी ही सूवर्ण संधी आहे. यंदा दिवाळी पहाट आयोजनाचे १२ वे वर्ष आहे. यंदाच्या पहाटमध्ये रसिकांना आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या दिग्गज कलाकारांना अनुभवण्याची संधी मिळणार आहे.पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांसाठी दिवाळी पहाटचे विशेष महत्त्व आहे. दिवाळीनिमित्त सांस्कृतिक मेजवानीची वाट अनेकजण पाहत असतात.
सुमधुर गायन, वादन आणि रसिकांची दाद अशा सुंदर वातावरणात मागील दिवाळी पहाट रंगल्या आहेत. यंदाही रसिकांना पाच दिवाळी पहाट अनुभवता येणार आहे. पुणेकर रसिकांसाठी खास दिवाळीत लोकमत दिग्गज कलावंतांना बोलावत असते, त्यामुळे लोकमत ‘स्वरचैतन्य’ दिवाळी पहाट ही दरवर्षीच विशेष आणि संस्मरणीय ठरत असते. दिवाळी पहाटचे विनामूल्य आयोजन करणारा ‘लोकमत’ एकमेव माध्यम समूह असून रविवार (दि. १२) पासून पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड येथील विविध केंद्रावर विनामूल्य प्रवेशिका उपलब्ध होणार आहेत. आतापर्यंत जागतिक ख्यातीच्या कलावंतांनी दिवाळी पहाटची परंपरा आपल्या गायकीने समृद्ध केली आहे. त्यामुळे ‘लोकमत’ची दिवाळी पहाट आणि पुणेकर, पिंपरी-चिंचवडकर रसिक एक समीकरण झाले आहे.
-----पद्मश्री सुरेश वाडकर आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेती सावनी रवींद्र यांचे अविस्मरणीय सादरीकरणरंगभूमीवरील संगीताचे एक अनोखे पर्व म्हणजे पद्मश्री सुरेश वाडकर आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेती गायिका सावनी रवींद्र यांचे सादरीकरण. ही दिवाळी पहाट संगीतप्रेमींसाठी अविस्मरणीय ठरणार आहे. शास्त्रीय संगीताच्या अद्वितीय धारा आणि आधुनिक वाद्यांचा संगम यंदा दिसून येईल. पुनीत बालन ग्रुप प्रस्तुत ‘स्वरचैतन्य’ दिवाळी पहाट रामा यांच्या सहयोगाने आयोजित करण्यात आली असून सहयोगी प्रायोजक सुहाना मसाले, पीएनजी ज्वेलर्स, लोकमान्य सोसायटी, काका हलवाई, आरा स्टाईल आहेत. तसेच सह-प्रायोजक म्हणून मनोहर सुगंधी, पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट, सूर्या इलेक्ट्रॉनिक्स, जय मातृभूमी युवा मंच, डूह, साईराज होर्डिंग, लोकमत सखी आणि घे भरारी यांचा सहभाग आहे.
शनिवार १८ ऑक्टोबर पहाटे ५.३० वा.स्थळ : श्रीमान महासाधू श्री मोरया गोसावी क्रीडासंकुल
---हडपसरमध्ये साजरा होणार कलेचा उत्सव
हडपसरवासीयांची यंदाची दिवाळी पहाट स्मरणीय ठरणार आहे. रसिकांना शास्त्रीय संगीत, भक्ती संगीत आणि आधुनिक गायनाची गोडी चाखता येणार असून पं. रघुनंदन पणशीकर, विदुषी सावनी शेंडे, आर्या आंबेकर आणि रमाकांत गायकवाड यांचे सादरीकरण यथासांग सादर होणार आहे. लोकमत आयोजित आणि पुनीत बालन ग्रुप प्रस्तुत ‘स्वरचैतन्य’ दिवाळी पहाटचे सहयोगी प्रायोजक सुहाना मसाले, चंदूकाका सराफ, लोकमान्य सोसायटी, काका हलवाई असून सह प्रायोजक मनोहर सुगंधी, शुभम ग्रुप ऑफ कंपनीज आऊटडोर पार्टनर आहेत.रविवार, १९ ऑक्टोबर , पहाटे ५:३० वा
स्थळ : विठ्ठल तुपे पाटील ऑडिटोरियम, हडपसर--तीन दिग्गजांच्या सादरीकरणाने बालेवाडीकरांना अनुभवता येणार कलाविष्कर :
संगीताच्या उत्कृष्ठतेला गोड आवाज आणि अप्रतिम वादनाची साथ असा सुंदर कलाविष्कार यंदाच्या लोकमत आयोजित आणि डॉ. सागर बालवडकर प्रस्तुत ‘स्वरचैतन्य’दिवाळी पहाटमध्ये बालेवाडीकरांना अनुभवायला मिळणार आहे. बालेवाडीमध्ये होणारी ही दिवाळी पहाट आदर्श ठरणार असून पद्मश्री शुभा मुद्गल, नीलाद्री कुमार आणि सत्यजित तळवलकर या तिघांचा कलाविष्कार अनुभवता येणार आहे. एएनपी कॉर्प यांच्या सहयोगाने होणार असून सहयोगी प्रायोजक सुहाना मसाले, न्याती ग्रुप्स, लोकमान्य सोसायटी, काका हलवाई आहेत तर सह प्रायोजक मनोहर सुगंधी, ऊर्जा आणि शुभम ग्रुप ऑफ कंपनीज आऊटडोर पार्टनर आहेत.सोमवार, २० ऑक्टोबर , पहाटे ५:३० वा
स्थळ : सी. एम. इंटरनॅशनल स्कूल मैदान, एस. के. पी. कॅम्पस, बालेवाडी---पं. शौनक अभिषेकी, विदुषी मंजूषा पाटील, पं. जयतीर्थ मेवुंडी असा सुरांचा त्रिवेणी संगमलोकमत आयोजित पुनीत बालन ग्रुप प्रस्तुत ‘स्वरचैतन्य’ दिवाळी पहाटचे आयोजन यंदा पहिल्यांदा सातार रस्ता येथे करण्यात आले आहे. याठिकाणी पंडित शौनक अभिषेकी, विदुषी मंजूषा पाटील आणि पंडित जयतीर्थ मेवुंडी हे तीन दिग्गज कलाकारांचे सादरीकरण होणार आहे. या कार्यक्रमाचे सहयोगी प्रायोजक चाटे ग्रुप ऑफ एज्युकेशन, सुहाना मसाले, लोकमान्य सोसायटी, काका हलवाई असून सह प्रायोजक मनोहर सुगंधी, शुभम ग्रुप ऑफ कंपनीज आऊटडोर पार्टनर आहेत.
मंगळवार, २१ ऑक्टोबर, पहाटे ५:३० वास्थळ : अण्णा भाऊ साठे सभागृह, पद्मावती, सातारा रोड, पुणे.
----
सूर, ताल आणि भावांचा संगम : पद्मविभूषण विश्व मोहन भट, पद्मश्री विजय घाटे, महेश काळे
संगीत ही केवळ कलाच नव्हे, ती साधना आहे आणि ही साधना जेव्हा तीन आघाडीचे कलाकार एकत्र करतात, तेव्हा निर्माण होतो एक अद्वितीय नादयोग. पद्मविभूषण पं. विश्व मोहन भट यांच्या मोहन वीणेचे स्वर, पद्मश्री विजय घाटे यांच्या तबल्याचा झंकार आणि प्रसिद्ध गायक राष्ट्रीय पुरस्कार विजेते महेश काळे यांच्या भावपूर्ण गायकीने सारा परिसर स्वरमय होणार आहे. लोकमत आयोजित पुनीत बालन ग्रुप प्रस्तुत ‘स्वरचैतन्य’ दिवाळी पहाट न्याती ग्रुप आणि सुहाना मसाले यांच्या सहयोगाने होणार असून पीएनजी ज्वेलर्स, लोकमान्य सोसायटी, काका हलवाई, गिरीश खत्री ग्रुप सहयोगी प्रायोजक आहेत तर सह प्रायोजक मनोहर सुगंधी, ऊर्जा आहेत.बुधवार, २२ ऑक्टोबर, पहाटे ५:३० वा
स्थळ : महालक्ष्मी लॉन्स, कर्वेनगर, पुणे.
Web Summary : Pune and Pimpri-Chinchwad gear up for Lokmat's 'Diwali Pahat' at five locations. Renowned artists like Suresh Wadkar, Savani Ravindra, and Shubha Mudgal will perform. The free events start Oct 18, offering a cultural feast to music lovers.
Web Summary : पुणे और पिंपरी-चिंचवड में लोकमत का 'दिवाली पहाट' पाँच स्थानों पर आयोजित किया जाएगा। सुरेश वाडकर, सावनी रवींद्र और शुभा मुद्गल जैसे प्रसिद्ध कलाकार प्रदर्शन करेंगे। 18 अक्टूबर से शुरू होने वाले ये मुफ्त कार्यक्रम संगीत प्रेमियों को सांस्कृतिक आनंद प्रदान करेंगे।