पळसोशीत जनावरांच्या चाऱ्याची गंजी आगीत खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 23:41 IST2019-02-18T23:41:16+5:302019-02-18T23:41:41+5:30
आग लावल्याचा संशय : पंचवीस हजारांहून अधिक नुकसान

पळसोशीत जनावरांच्या चाऱ्याची गंजी आगीत खाक
नेरे : भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील पळसोशी येथील शेतकरी राजाराम खंडू म्हस्के यांनी घराशेजारी जनावरांसाठी साठवणूक करून ठेवलेल्या चाºयांच्या गजींना रात्रीच्या वेळी अज्ञातांनी लावलेल्या आगीत चारा, तसेच हरभरा जळून खाक झाला आहे. आधीच दुष्काळामुळे जनावरांना चारा मिळत नसताना चाºयांच्या गंजी खाक झाल्यामुळे जणू दुष्काळाता तेरावा अशी परिस्थिती पळसोशी येथे निर्माण झाली आहे.
तालुक्यात सध्या गवत कापणी उरकली असून, पुढील काळात उन्हाळ्याच्या दिवसात जनावरांसाठी चारा मिळण्यासाठी गावागावांत गवतांच्या गंजी लावून चारा साठवणूक करून ठेवण्यात आला आहे. त्याप्रमाणे विसगाव खोºयातील पळसोशीतील राजाराम म्हस्के यांनी दोन हजार गवत, नऊशे भात भेळा, चालू रब्बीतील १५ हरभरा भारे (दोन पोती हरभरा), घराशेजारील मोकळ्या जागेत साठवून ठेवला होता. या जनावरांच्या चाºयाला अज्ञातांनी रात्रीच्या वेळी आग लावल्याने जळून खाक आले.
एका वर्षात ही दुसरी घटना
मागील वर्षी येथील ग्रामदैवत वाघजाई माता मंदिरा पाठीमागे अज्ञातींनी दुचाकी पेटवून दिली होती. त्यात ती जळून खाक झाली. याचा तपास लागला नाही तोच ही जनावरांचा चारा पेटवून देण्याची दुसरी घटना घडली आहे.
या आगीत एकूण २५ हजारांहून अधिक म्हस्के यांचे नुकसान झाले आहे. रात्रीच्या वेळी लागलेल्या या आगीत तरुणांच्या सतर्कतेने शेजारील अनेक शेतकºयांची पिके व चारा वाचवण्यात आला आहे. नेरे, बाजारवाडी (ता.भोर) परिसरात अशा अनेक घटना घडत आहेत. या जळीताचा पंचनामा तलाठी, तसेच ग्रामस्थांनी केला असून या शेतकºयाला शासनाकडून लवकरात लवकर मदत देण्यात यावी, अशी मागणी शेतकरी संघटनांकडून होत आहे. या जळीताच्या प्रकारामुळे शेतकºयांचे अतोनात नुकसान होत असल्याने शेतकºयांंमध्ये घबराटीचे वातावरण आहे.