पुण्यातून कामगारांना घेऊन पहिली रेल्वे मध्यप्रदेशला रवाना; डोळ्यात आनंदाश्रू अन् मनात आभाराची भावना

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2020 06:07 PM2020-05-07T18:07:10+5:302020-05-07T18:32:23+5:30

एमआयडीसी सुरू झाल्याने ३००-३५० कामगारांनी आपल्या गावी जाण्याचा निर्णय केला रद्द  

The first train with 850 to 900 workers from Pune left for Madhya Pradesh | पुण्यातून कामगारांना घेऊन पहिली रेल्वे मध्यप्रदेशला रवाना; डोळ्यात आनंदाश्रू अन् मनात आभाराची भावना

पुण्यातून कामगारांना घेऊन पहिली रेल्वे मध्यप्रदेशला रवाना; डोळ्यात आनंदाश्रू अन् मनात आभाराची भावना

Next
ठळक मुद्देखासगी बस, स्पेशल रेल्वेद्वारे कामगारांना आपल्या राज्यात सोडण्याची तयारी सुरूजिल्ह्यातील सर्व एमआयडीसीमध्ये उद्योग धंदे पूर्ववत सुरू होत असून, कामगारांची मोठी गरज कामगारांनी आपल्या गावी जाण्याची घाई करू नये असे आवाहन

पुणे: पुणे जिल्ह्यातील रांजणगाव एमआयडीसीमध्ये काम करणाऱ्या मध्यप्रदेश येथील सुमारे १२०० कामगारांची शिरूर तहसीलदार कार्यालयामार्फत वैद्यकीय तपासणी पूर्ण करून यादी तयार करण्यात आली.या कामगारांना घेऊन जाण्यासाठी जिल्हा प्रशासनाने समन्वयक साधून रेवा (मध्ये प्रदेश) स्पेशल श्रमिक रेल्वे बुक केली.परंतु रांजणगाव एमआयडीसीमधील उद्योग धंदे होऊन कामगारांना काम मिळण्यास सुरवात झाल्याने ऐनवेळी ३०० ते ३५० कामगारांनी आपल्या गावी जाण्याचा निर्णय रद्द केला. यामुळे गुरूवारी सायंकाळी ५ वाजता ८५० ते ९०० कामगारांना घेऊन पुणे जिल्ह्यातील पहिली रेल्वे मध्ये प्रदेशला रवाना झाली, अशी माहिती उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी दिली.
राज्यात आणि देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात २४ मार्च रोजी लॉकडाऊनची घोषणा केली. तेव्हापासून पुणे जिल्ह्यातील सर्व एमआयडीसी व अन्य क्षेत्रातील सर्व उद्योग-धंदे, कारखाने व खाजगी आस्थपना बंद आहेत. हातांना काम नसल्याने व पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये दररोज कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत असल्याने कामगारांमध्ये प्रचंड धास्तीचे वातावरण आहे. कामगारांची उपासमार होऊन नये म्हणून जिल्हा प्रशासनाने खाण्याची व राहण्याची सोय केली. परंतु तरी देखील प्रचंड मोठ्या संख्येने कामगारांना आपल्या गावाकडे जाण्याची ओढ लागली होती. यावेळी घरी सुखरूप जाताना  कामगारांच्या डोळ्यात आनंदाश्रू आणि सहकार्य केल्यामुळे प्रशासनाबद्दल मनात आभाराची भावना दाटून आली होती.

अखेर राज्य शासनाने व केंद्र शासनाने ३ मे नंतर लॉकडाऊन शिथिल करून कामगारांना आपल्या गावाकडे जाण्याची परवानगी देण्यात आली. त्यानूसार जिल्हा प्रशासनाने कोणत्या राज्यात, जिल्ह्यात किती कामगार जाणार यांच्या याद्या तयार करून खासगी बस, स्पेशल रेल्वेद्वारे कामगारांना आपल्या राज्यात सोडण्याची तयारी सुरू केली आहे. यामध्ये गुरूवार (दि.७) रोजी मध्ये प्रदेशमध्ये जाणाऱ्या सुमारे कामगारांसाठी रेवा (मध्ये प्रदेश) स्पेशल श्रमिक रेल्वेची व्यवस्था करण्यात आली. परंतु सायंकाळी काही कामगारांनी आपण जाणार नसल्याचे कळविले. यामुळे सायंकाळी ५ वाजता ८५० ते ९०० कामगारांना घेऊन पुणे जिल्ह्यातील पहिली रेल्वे मध्यप्रदेशला रवाना झाली, अशी माहिती उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी दिली.
------- 
कामगारांनी जाण्याची घाई करू नये 
राज्यात प्रतिबंधित क्षेत्राताबाहेर निर्बंध शिथील करण्यात आली आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पुणे जिल्ह्यात पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील उद्योग सुरू करण्यासाठी कोणत्याही औपचारिक परवानगीची, पासेसची गरज नाही, असे स्पष्ट केले आहे. यामुळे गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यातील बहुतेक सर्व एमआयडीसीमध्ये उद्योग धंदे पूर्ववत सुरू होत असून, कामगारांची मोठी गरज आहे. यामुळे कामगारांनी आपल्या गावी जाण्याची घाई करू नये असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

......
मध्यप्रदेशमध्ये जाणाऱ्या कामगारांना फूड पॅकेट व होमिओपॅथी गोळ्या...
पुणे जिल्ह्यातून मध्ये प्रदेशमध्ये स्पेशल रेल्वेद्वारे जाणाऱ्या कामगारांना रेल्वे प्रवासात रात्रीच्या जेवणासाठी जिल्हा प्रशासनाकडून खाजगी संस्थांच्या मदतीने फूड पॅकेट, प्रत्येक दोन पाणी बाटल्या व होमिओपॅथी गोळ्या देखील देण्यात आले असल्याचे उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी दिली.

Web Title: The first train with 850 to 900 workers from Pune left for Madhya Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.