शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

कऱ्हा नदीला ५० वर्षांत प्रथमच महापूर; नदीकाठच्या गावांमध्ये शिरले पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2019 08:48 IST

पुरंदर तालुक्यामध्ये गुरुवारी (२६) मध्यरात्री झालेल्या ढगफुटीचा फटका बारामती तालुक्याला बसला.

बारामती- पुरंदर तालुक्यामध्ये गुरुवारी (२६) मध्यरात्री झालेल्या ढगफुटीचा फटका बारामती तालुक्याला बसला. पुरंधर भागात पडलेल्या मुसळधार पावसामुळे क-हा नदीला ५० वर्षात प्रथमच महापूर आला आहे. पुरामुळे नदीकाठच्या अनेक गावांचा संपर्क तुटला असून कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. नदीकाठच्या अनेक कुटुंबांना वेळेत सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. प्रशासनाच्या सतर्कतेमुळे मोठी जीवितहानी टळली आहे. नदीकाठच्या शेतीला मोठा फटका बसला आहे. तसेच हजारो विहिरी पाण्याखाली गेल्या आहेत. तालुक्यातील १५ हजार, बारामतीच्या ७  हजार ५०० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याच्याहालचाली प्रशासनाने सुरू केल्या आहेत.क-हा नदीकाठी असणा-या आंबी बु,आंबी खुर्द, मोरगाव, तरडोली, माळवाडी, बाबुर्डी, जळगाव कडे पठार, जळगाव सुपे आदीगावांमधील नदीकाठच्या नागरीकांना हलविण्यात आले आहे. पुरंदरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे रात्री १.३० वाजता पाण्याचा मोठा विसर्ग नाझरे धरणातून सुरू करण्यात आला. तत्पूर्वी प्रशासनाने रिक्षातून भोंगा लावून पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या. प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार विजय पाटील यांनी नदीकाठच्या गावांना भेटी दिल्या. रात्रीपासूनच मोरगावच्या मुख्य चौकातून सुपेकडे जाणारी वाहतूक थांबविण्यात आली. नदीकाठची घरे पाण्याखाली गेली आहेत. अनेक नागरीकांनी स्वतः हून स्थलांतर केले. रात्री गराडे धरण, नाझरे धरण फुटल्याची पसरली होती.पन्नास वर्षांत प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात  क-हा नदीला पूर आला नसल्याचे का-हाटी  येथील शेतकरी वाल्मीकराव वाबळे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले. नदीकाठी असलेल्या गावांना पाऊस नाही. मात्र, पुराचा फटका बसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. या पुराचा फटका कोल्हापूर पद्धतीच्या बंधा-यांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. अनेक बंधा-यांचे कठडे तसेच संरक्षण भिंती तुटून पडल्या आहेत. बारामती तालुक्यातील आंबी, मोरगाव, तरडोली, बाबुर्डी ,माळवाडी, का-हाटी, फोंडवाडा ,जळगाव क.प., लोणकर वस्ती, जगताप वस्ती, क-हावागज, नेपतवळण, ब-हाणपूर, अंजनगाव येथील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याखाली गेले आहेत.——————————————————...बारामती शहरात ‘हाय अ‍ॅलर्ट’बारामती शहरात प्रशासनाने नदीकाठच्या लोेकांना खबरदारीच्या सूचना देऊन रात्रीच सुरक्षित स्थळी हलविले आहे. नागरिकांनी इलेक्ट्रॉनिक वस्तूं, महत्त्वाची कागदपत्रे, किमती वस्तू सुरक्षित ठिकाणी हलविल्या आहेत. काल रात्रीपासूनच रिक्षाद्वारे पुकारून शहरातीलखंडोबानगर, वणवेमळा, पंचशीलनगर, म्हाडा कॉलनी, अनंत आशानगर, टकार कॉलनी या भागातील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.——————————————————...क-हा नदीच्या पात्रात ८० हजार क्युसेक्स पाणी विसर्गक-हा नदीला महापूर येण्यापूर्वी पाटबंधारे खात्याने पात्रात ८० हजार क्युसेक्स पाणी विसर्ग केल्याचे संदेश प्रसारीत केले. त्यानंतर रात्रीचमहसूल, नगर परिषद प्रशासनाने शहरात सावधानतेचा इशारा दिला. तालुक्यातील १५ हजार, बारामती शहरातील ७  हजार ५०० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. प्रशासन सर्व पातळीवर सज्ज असल्याचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :Puneपुणेfloodपूर