शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

आधी पुणे शहर सुरळीत सुरू करा, त्यानंतरच आम्ही दुकाने सुरू करू : पुणे सराफ संघटनेचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2020 18:21 IST

सरकारने एका गल्लीतील केवळ ५ दुकाने खुली करावीत असा अनाकलनीय निर्णय घेतला..

ठळक मुद्देव्यावसायिकांच्या सरकारकडून काही अपेक्षा असल्याचे नमूदबँकामधील सर्व ठेवींच्या सुरक्षेची हमी सरकारने घ्यावी

पुणे: शहरातील सर्व व्यवहार आधी सुरळीत होऊ द्या, मगच आम्ही आमची दुकाने सुरू करू अशी भूमिका पुणे सराफ असोसिएशनने घेतली आहे. संघटनेचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचे निवेदन दिले असून त्यात सराफ वव्यावसायिकांच्या सरकारकडून काही अपेक्षा असल्याचे नमूद केले आहे.  रांका म्हणाले, कर्ज घेतलेल्यांना आरबीआयने तीन महिने हप्ते जमा न करण्याची मुभा दिली आहे, मात्र ती अपुरी आहे. किमान ६ महिन्यांची सवलत द्यावी व नंतरही धकीत हप्ते टप्पे करून जमा करण्याची मूभा द्यावी. कोरोना लॉकडाऊन काळात व्यवसाय बंद होते. त्यामुळे लोकांजवळ खरेदीसाठी पैसे नाहीत, त्याचा विचार करून सरकारने पुढील किमान ३ महिने जीएसटी पुर्ण माफ करावा.कामगारांबाबत बोलताना रांका म्हणाले, १०० पेक्षा कमी कामगार असतील व त्यांच्यापैकी ९० टक्के जणांचे पगार १५ हजारपेक्षा कमी असतील तर अशा आस्थापनांमधील त्या कामगारांचा भविष्य निर्वाह निधीचा कोरोना लॉकडाऊन काळातील हप्ता सरकार जमा करणार आहे. हा निर्णय अन्य आस्थापनांवर अन्याय करणारा आहे. सरकारने पगाराची तसेच १०० कामगारांची अट काढून टाकावी व सर्वच कामगारांचा या काळातील भविष्य निर्वाह निधी जमा करावा. सरकारच सध्या डिजिटल ऑनलाईन पेमेंटचा आग्रह धरत आहे. मात्र अशा आर्थिक व्यवहारांवर बँक वाढत्या दराने कमिशन घेते. पुढील काही महिन्यांसाठी हे कमिशन बंद करावे असे रांका म्हणाले. बँकामधील विशिष्ट रकमेच्या ठेवींनाच सरकार सुरक्षा देते. असे न करता सर्व ठेवींना सरकारने सुरक्षेची हमी घ्यावी अशीही मागणी रांका यांनी केली.सरकारने एका गल्लीतील केवळ ५ दुकाने खुली करावीत असा अनाकलनीय निर्णय घेतला. मद्यविक्री करणारी दुकाने खुली केली. हे सगळे न समजणारे आहे अशी टीका रांका यांनी केली. आमच्या सराफ संघटनेचे पुणे पिंपरी-चिंचवड सह १७०० सदस्य आहेत. त्यामुळेच आम्ही आधी पुणे सुरळीत सुरू करा, नंतरच आमची दुकाने सुरू करू असा निर्णय घेतला असल्याची व तसे जिल्हाधिकाऱ्यांना कळवले असल्याची माहिती रांका यांनी '' लोकमत '' शी बोलताना दिली. 

टॅग्स :Puneपुणेjewelleryदागिनेcorona virusकोरोना वायरस बातम्याGovernmentसरकार