शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

पुण्यात पहिले रोटरी मराठी साहित्य संमेलन 4 आणि 5 जानेवारीला;पानिपतकार विश्वास पाटील संमेलनाध्यक्ष तर विनोद जाधव स्वागताध्यक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 19:24 IST

रोटरी व्होकेशनल एक्सलन्स ॲवॉर्ड प्रदान समारंभही लक्षवेधी ठरणार आहे.

- श्रीकिशन काळे पुणे : सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या रोटरी क्लबतर्फे शनिवार, दि. 4 जानेवारी आणि रविवार, दि. 5 जानेवारी 2025 रोजी पुण्यात पहिल्या रोटरी मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटन, समारोप समारंभासह साहित्यिक चर्चा, विविध विषयांवर परिसंवाद, मुलाखती, गप्पा, कविसंमेलन, प्रहसने, सांगीतिक कार्यक्रम तसेच संगीत नाटकाची मेजवानी पुणेकरांना मिळणार आहे. रोटरी व्होकेशनल एक्सलन्स ॲवॉर्ड प्रदान समारंभही लक्षवेधी ठरणार आहे.

यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात दोन दिवसीय संमेलन होणार असून संमेनलाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध कादंबरीकार विश्वास पाटील यांची निवड करण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचा आनंदोत्सव साजरा करण्याबरोबरच मराठी ही ज्ञानभाषा व्हावी, मराठी वाचन संस्कृतीचे जतन व्हावे, ती प्रवाहित राहावी या संकल्पनेतून पहिल्या रोटरी डिस्ट्रिक्ट मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती रोटरी प्रांतपाल शितल शहा, संयोजन समिती कार्याध्यक्ष राजीव बर्वे, रोटरी क्लब ऑफ पुणे हेरिटेजचे अध्यक्ष सूर्यकांत वझे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. सावा हेल्थकेअरचे संचालक विनोद जाधव संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. रोटरी क्लब ऑफ पुणे हेरिटेज हे या मराठी साहित्य संमेलनाचे मुख्य यजमान असून पुण्यातील 15 रोटरी क्लब सहयजमान आहेत. पत्रकार परिषदेला डिस्ट्रिक्ट व्होकेशनल डायरेक्टर मधुमिता बर्वे, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी मोहन चौबळ यांची उपस्थिती होती.

शनिवारी (दि. 4) सकाळी 9:15 वाजता ग्रंथदिंडी काढण्यात येणार असून यात रोटरियन्सचा सहभाग असणार आहे. सकाळी 9:50 वाजता पदन्यास कथक डान्स ॲकॅडमीच्या रेणुका केळकर-टिकारे आणि सहकारी गणेशवंदना सादर करणार आहेत. सकाळी 10 वाजता उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला असून संमेलनाचे उद्घाटन प्रसिद्ध क्रिकेटपटू पद्मभूषण चंदू बोर्डे यांच्या हस्ते होणार आहे. खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, नॅशनल बुक ट्रस्टचे विश्वस्त राजेश पांडे, नगरसेवक जयंत भावे, उपप्रांतपाल मोहन पालेशा, डि. लर्निंग जिल्हा प्रशिक्षक पंकज शहा, संतोष मराठे, नितीन ढमाले यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

उद्घाटन समारंभानंतर सकाळी 11:30 वाजता संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून वैशाली वेर्णेकर, अभय जबडे हे विश्वास पाटील यांची मुलाखत घेणार आहेत. दुपारी 2:30 वाजता योगेश सोमण लिखित ‌‘ट्रेनिंग‌’ हे प्रहसन अविनाश ओगले आणि लीना गोगटे सादर करणार आहेत. दुपारी 2:45 वाजता ज्येष्ठ साहित्यिक शिवराज गोर्ले यांच्या अध्यक्षतेखाली ‌‘यशस्वी लेखनाची सूत्रे‌’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला असून यात ज्येष्ठ नाटककार श्रीनिवास भणगे, साहित्यिक वंदना बोकील-कुलकर्णी यांचा सहभाग असणार आहे. त्यांच्याशी राजेश दामले संवाद साधणार आहेत. दुपारी 4:15 वाजता संजय डोळे लिखित ‌‘मन:शांती‌’ हे प्रहसन राजेंद्र उत्तुरकर, सुनिता ओगले सादर करणार आहेत.वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांच्या अध्यक्षतेखाली रोटरियन्सचा सहभाग असलेले निमंत्रितांचे कविसंमेलन सायंकाळी 4:30 वाजता आयोजित करण्यात आले असून यात अंकाजी पाटील, विजय पुराणिक, सुप्रिया जोगदेव, स्नेहल भट, ममता कोल्हटकर, डॉ. अश्विनी गणपुले, नीता केळकर, जयश्री कुबेर, डॉ. आनंदा कंक, राहुल लाळे, मुरलीधर रेमाणे, शशिकांत शिंदे, प्रदीप खेडकर, हर्षदा बावनकर, तनुजा खेर यांचा सहभाग आहे. संयोजन निनाद जोग करणार असून सूत्रसंचालन डॉ. अंजली कुलकर्णी करणार आहेत. रात्री 8:30 वाजता भरत नाट्य संशोधन मंदिराची निर्मिती असलेल्या पुरुषोत्तम दारव्हेकर लिखित आणि रवींद्र खरे दिग्दर्शित ‌‘संगीत कट्यार काळजात घुसली‌’ या नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला आहे. पं. जितेंद्र अभिषेकी यांचे संगीत असून अभय जबडे, रवींद्र खरे, अर्णव पुजारी, वज्रांग आफळे, विश्वास पांगारकर, निधी घारे, अनुष्का आपटे, ऋषिकेश बडवे आणि डॉ. चारुदत्त आफळे यांच्या भूमिका आहेत. राहुल गोळे, अथर्व आठल्ये, प्रज्ञा देसाई यांची साथसंगत असणार आहे.

रविवारी (दि. 5) सकाळी 9:50 वाजता पदन्यास कथक डान्स ॲकॅडमीच्या रेणुका केळकर-टिकारे आणि सहकारी शिववंदना सादर करणार आहेत. सकाळी 10 वाजता प्रसिद्ध व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांचा रोटरी व्होकेशनल एक्सलन्स ॲवॉर्डने सन्मान करण्यात येणार असून पुरस्काराचे वितरण सुप्रसिद्ध कवी अशोक नायगावकर यांच्या हस्ते होणार आहे. सकाळी 11 वाजता अशोक नायगावकर यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम होणार असून प्रा. मिलिंद जोशी त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. दुपारी 2 वाजता सुप्रिया जोगदेव लिखित ‌‘ऑफिस ऑफिस‌’ हे प्रहसन शंतनु खुर्जेकर, अविनाश ओगले सादर करणार आहेत.माजी प्रांतपाल, ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ दीपक शिकारपूर यांच्या अध्यक्षतेखाली ए. आय.चा साहित्यावर परिणाम होईल का? या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला असून यात प्रदीप निफाडकर, कुलदीप देशपांडे, महेश बोंद्रे, डॉ. आदित्य अभ्यंकर यांचा सहभाग असणार आहे. दुपारी 3:45 वाजता संजय डोळे लिखित ‌‘आगलावे वि. पेटवे‌’ हे प्रहसन संजय डोळे, पूजा गिरी, राजेंद्र उत्तुरकर, मधुर डोलारे सादर करणार आहेत. दुपारी 4 वाजता ‌‘अमृतसंचय‌’ हा ग. दि. माडगूळकर यांच्या गीतांवर आधारित सांगीतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून मुग्धा ढोले, आसावरी गोडबोले, दीपक महाजन, श्रीकांत बेडेकर गीते सादर करणार आहेत. अनिल गोडे, मिलिंद गुणे, मिहिर भडकमकर, सचिन वाघमारे, स्वयम्‌‍ सोनावणे, रोहित साने साथसंगत करणार आहेत. संयोजन मनिषा अधिकारी यांचे असून निवेदन स्नेहल दामले करणार आहेत.

सायंकाळी 5:30 वाजता प्रसिद्ध राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर आणि ‌‘असत्यमेव जयते‌’चे लेखक अभिजित जोग यांच्या समवेत मनमोकळ्या गप्पांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या प्रसंगी सहकार आणि नागरी विमान वाहतूक केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची उपस्थिती असणार आहे. त्यानंतर संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील आणि प्रांतपाल शितल शहा, सूर्यकांत वझे यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप समारंभ आयोजित करण्यात आला आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडmarathiमराठीEducationशिक्षण