शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
2
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
3
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
4
हैदराबादमध्ये पावसाचं थैमान! SRH vs GT सामना रद्द झाल्यास संपुष्टात येईल RCB चं आव्हान?
5
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
6
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
7
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
8
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
9
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
10
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
11
"लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या"; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं!
12
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
13
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
14
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
15
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
16
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
17
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा
18
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
19
T20 WC पूर्वी भारतीय संघाच्या सराव सामन्याची तारीख व संघ ठरला! जाणून घ्या अपडेट्स 
20
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट

प्रथम रस्ता पूर्ण करा; त्यानंतरच टोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 2:01 AM

खेड ते सिन्नर बाह्यवळणासाठी कोणतेही भूसंपादन बाकी नसताना बाह्यवळणाचा रस्ता अपूर्ण का आहे? प्रथम रस्ता पूर्ण करावा त्यानंतरच टोल आकारणी करावी. येत्या १५ जुलै रोजी टोल बंद केला जाईल, याशिवाय रस्त्याच्या प्रलंबित कामांना गती येणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया अनेक शेतकरी व विविध गावातील नागरिकांनी व्यक्त केली.

नारायणगाव - खेड ते सिन्नर बाह्यवळणासाठी कोणतेही भूसंपादन बाकी नसताना बाह्यवळणाचा रस्ता अपूर्ण का आहे? प्रथम रस्ता पूर्ण करावा त्यानंतरच टोल आकारणी करावी. येत्या १५ जुलै रोजी टोल बंद केला जाईल, याशिवाय रस्त्याच्या प्रलंबित कामांना गती येणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया अनेक शेतकरी व विविध गावातील नागरिकांनी व्यक्त केली़दरम्यान, संपादित जमिनींच्या तक्रारी संदर्भात दर गुरुवारी नारायणगाव येथे मंडलाधिकारी कार्यालयात ११ ते ३ या वेळेत भूसंपादनाचे अधिकारी उपस्थित राहून बाधित शेतकऱ्यांच्या तक्रारींचा आढावा घेतील, असे आश्वासन भूसंपादन विभाग क्ऱ १३ च्या उपजिल्हाधिकारी रेश्मा माळी व समन्वयिका उपजिल्हाधिकारी समिक्षा चंद्रकार यांनी नारायणगाव येथे दिले़राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने येत्या १५ जुलै रोजी चाळकवाडी टोलनाका बंद करून आंदोलन करण्याचे निवेदन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जिल्हाधिकारी यांना मागील आठवड्यात देण्यात आले होते़ त्या निवेदनाच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय अधिकारी अजित देशमुख यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने आंदोलन न करता समन्वयातून प्रश्न सोडवावा यासाठी दोन वेळा समन्वय बैठक घेण्यात आली होती़ मंगळवारी १० जुलै रोजी दुसरी बैठक कुकडी पाटबंधारे विभागातील विश्रामगृहात आयोजित करण्यात आली होती़ या बैठकीत भोरवाडी, नारायणगाव, वारूळवाडी, पिंपळवंडी, भटकळवाडी व आळेफाटा येथील प्रलंबित बाह्यवळण संदर्भातील शेतकºयांच्या समस्या व अडचणी समजून घेण्यात आल्या़जुन्नर विभागाचे उपविभागीय अधिकारी अजित देशमुख यांनी भूसंपादन विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभाग, पोलीस प्रशासन व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी यांची समन्वय बैठक आयोजित केली होती़ यावेळी युवा नेते अतुल बेनके, जि़ प़ सदस्य शरद लेंडे, तालुकाध्यक्ष सुरज वाजगे, भूसंपादन विभाग क्ऱ १३ च्या उपजिल्हाधिकारी रेश्मा माळी व समन्वयिका उपजिल्हाधिकारी समिक्षा चंद्रकार, जुन्नरचे तहसीलदार किरण काकडे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाचे सहाय्यक अभियंता दिलीप शिंदे, आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जी़ आर. उगले, सहायक पोलीस निरीक्षक अजय गोरड, मोहित ढमाले, कात्रज दूध संघाचे संचालक बाळासाहेब खिलारी, आदिवासी नेते मारुती वायाळ, सरपंच विक्रम भोर, अमित बेनके, संजय वारुळे, राजेश बेनके, रघुनाथ लेंडे, सोपान लेंडे आदी मान्यवर व भूसंपादित शेतकरी उपस्थित होते़यावेळी बोलताना चंद्रकार म्हणाल्या, की शासनाने शेतकºयांना रेडी रेकनरनुसार जमिनीला बाजारभाव दिलेले आहेत़ बाधित शेतकºयांचे सरकारकडून जमिनींचा मोबदला येणे असेल, त्या शेतकºयांना येत्या दहा दिवसांत मोदबला मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल़ ज्या शेतकºयांचा कोर्टात मोबदला जमा करण्यात आला होता़ ती रक्कम पुन्हा शासनाकडे जमा करण्यात आलेली आहे़ लवकरच ती रक्कम अदा करण्यात येईल़ नागरिकांच्या सर्व तक्रारींसंदर्भात जिल्हाधिकारी यांचेकडे माहिती देवून त्यावर लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले़रेश्मा माळी म्हणाल्या, की या बैठकीत नागरिकांनी केलेल्या मागणीनुसार पुणे येथील भूसंपादन कार्यालयातून नारायणगाव येथील मंडलाधिकारी कार्यालयात दर गुरुवारी ११ ते ३ या वेळेत येऊन लेखी स्वरूपात कागदपत्रांची पूर्तता करावी़ तसेच कोणाच्या काही तक्रारी असल्यास त्यांनी लेखी स्वरूपात सादर कराव्यात़ दोन महिन्यांसाठी भूसंपादन विभागाचे अधिकारी नारायणगाव येथे उपलब्ध राहतील़ यावेळी अतुल बेनके म्हणाले, की रस्ता पूर्ण झाल्याशिवाय टोल सुरू होऊ देणार नाही़ महामार्गाचे संपूर्ण काम झाले नाही़ सब ठेकेदार व्ही़ एम. मातेरे पळून जाण्याचे कारण काय? याची उत्तरे द्यावीत. शासनाने स्वत:हून टोल बंद करून जोपर्यंत रस्त्याचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत टोलनाका सुरू करू नये़रघुनाथ लेंडे यांनी पिंपळवंडी व भटकळवाडी येथे शेतकºयांच्या चुकीच्या पद्धतीने रस्त्यासाठी जागा संपादित केली आहे़ ज्या शेतकºयांची जागा संपादित केली आहे, त्या शेतकºयांच्या गटातील इतर शेतकºयांच्या सातबारावरही अतिरिक्त भूसंपादन दाखविण्यात आले आहे. महामार्गालगतच्या जागांना सरकारने २०१३ ला प्रतिगुंठा ४८ हजार रुपये हा दिलेला बाजारभाव अन्यायकारक आहे़वरुण भुजबळ यांनी सांगितले, की कागदपत्रांची पूर्तता करूनही जागेचे निकाल प्रलंबित आहेत़ नारायणगाव व वारूळवाडी शेजारी असूनही नारायणगाव येथील शेतकºयांना जास्त दर व वारूळवाडी येथील शेतकºयांना कमी दर देण्यात आल्याबद्दल नाराजी व्यक्त केली़समस्यांकडे लक्ष देण्यास वेळ नाहीया बैठकीत मुकेश वाजगे हा तरुण भावनाविवश झाला़ वडिलांना उपचारासाठी पुणे येथे नेत असताना वेळेत उपचार न झाल्याने त्यांचा मृत्यू झाला़ वाहतूककोंडीमुळे अनेक घडना घडत आहेत़ आमच्या समस्यांकडे लक्ष देण्यास कोणालाही वेळ नाही़ टोल बंद करण्याचा निर्णय योग्यच आहे, असे मत त्याने व्यक्त केले़या समन्वय बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी यांना समन्वय अधिकारी यांच्याकडून सकारात्मक उत्तर न मिळाल्याने येत्या १५ जुलैला टोलनाका बंद करण्यात येईल, असे अतुल बेनके यांनी जाहीर केले़ या आंदोलनामध्ये संभाजी ब्रिगेड, शेतकरी कामगार संघटना, नॅशनल आदिवासी पिपल्स फेडरेशन संघटना, आळे ग्रामस्थ यांनी पाठिंबा जाहीर केला आहे़उपविभागीय अधिकारी अजित देशमुख यांनी या बैठकीचे नियोजनकेले होते़ मात्र बैठक सुरू होताच देशमुख हे बैठकीतून निघून गेल्याने तसेच या बैठकीला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाचे प्रकल्प संचालक पी. जी. खोडसकर उपस्थित न राहिल्याने उपस्थितांनी नाराजी व्यक्त केली़आळे ग्रामपंचायतीचे ग्रा़ प़ं सदस्य धनंजय काळे , येडगावचे सरपंच देविदास भोर, सतेज भुजबळ, अशोक घोडके, सुरज वाजगे, मुकेश वाजगे, राजेश बेनके, धनंजय काळे, बाळासाहेब खिल्लारी, मोहित ढमाले, सोपान लेंडे आदींनी आपल्या समस्या या बैठकीत मांडल्या़- विक्रम भोर, सरपंच, कांदळी गाव

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या