शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

‘सोपानकाकांच्या चरणी अश्व धावले रिंगणी’ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 14:24 IST

‘ज्ञानोबा- तुकाराम आणि माऊली-माऊली’च्या अखंड जयघोषात अश्वाने रिंगण केले आणि विठ्ठल-विठ्ठल अशा जयघोषाने अवघा परिसर दुमदुमून गेला.

ठळक मुद्देसोमेश्वरनगरला पहिला रिंगण सोहळा : हजारो भाविकांची उपस्थिती

सोमेश्वरनगर : येथे आज हजारो वारकऱ्यांच्या उपस्थित विठूनामाचा गजर करीत सोपानकाका पालखी सोहळ्यातील पहिले अश्वरिंगण पार पडले. ‘सोपानकाकाचरणी अश्व धावता रिंगणी’ हजारो भाविकांचे आणि उपस्थितांचे डोळ्यांचे पारणे फिटले.मंगळवारी (दि. २) दुपारी ४ वाजता मु.सा. काकडे महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणात संत सोपानकाका पालखी सोहळ्याचे पहिले अश्वरिंगण उत्साहात पार पडले. विठ्ठलनामाच्या जयघोषाने हजारो वारकऱ्यांनी या सोहळ्याची रंगत वाढवली. हा अनुपम सोहळा याचि देही याचि डोळा पाहण्यासाठी परिसरातील हजारो भक्तांनी गर्दी केली होती. ‘ज्ञानोबा- तुकाराम आणि माऊली-माऊली’च्या अखंड जयघोषात अश्वाने रिंगण केले आणि विठ्ठल-विठ्ठल अशा जयघोषाने अवघा परिसर दुमदुमून गेला. महिला वारकऱ्यांनी डोक्यावर तुळस आणि वारकऱ्यांनी भगव्या पताका उंचावून या रिंगण सोहळ्याचा आनंद लुटला. विश्वस्त गोपाळमहाराज गोसावी आणि श्रीकांत गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली रिंगण सोहळा पार पडला.  तत्पूर्वी, सोमवारी (दि. १) मांडकी (ता. पुरंदर) येथील मुक्काम हलवून पालखीने जेऊर, पिंपरे खुर्द आणि नीरा येथील विसाव्यानंतर सकाळी बारामती तालुक्यात प्रवेश केला. निंबूत येथे सोहळा दाखल झाल्यानंतर शेतकरी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष सतीश काकडे, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद काकडे, माजी सदस्या सविता काकडे, सरपंच राजकुमार बनसोडे, उपसरपंच उदय काकडे, सहायक गटविकास अधिकारी बी. एस. साळवे, ग्रामसेवक सचिन लिंबरकर, प्रदीप काकडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. बाबालाल काकडे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी लेझीमच्या गजरात वारकऱ्यांचे स्वागत केले. ग्रामपंचायत निंबूत, ग्रामविकास प्रतिष्ठान, साहेबरावदादा सोसायटी तसेच परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने वारकऱ्यांसाठी चहा, नाश्ता, जेवण, फळे आणि उपवासाच्या पदार्थांचे वाटप करण्यात आले.   सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या वतीने सोहळ्याचे उत्साहात स्वागत करण्यात आले. अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, उपाध्यक्ष लालासाहेब माळशिकारे आदी यावेळी उपस्थित होते.  ...............४निंबूत छपरी येथे पालखीचे स्वागत गौतम काकडे, सोमेश्वरचे संचालक लक्ष्मण गोफणे, अमर काकडे यांनी केले. अक्षय शिंदे फाउंडेशनच्या वतीने वारकºयांसाठी राहण्याची व भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. वाघळवाडी येथे दुपारी तीन वाजता पालखीचे स्वागत सरपंच नंदा सकुंडे, उपसरपंच जितेंद्र सकुंडे, सतीश सकुंडे, सदस्य हेमंत गायकवाड, पांडुरंग भोसले, ग्रामसेवक सुभाष चौधर, अजिंक्य सावंत महावितरणचे अधिकारी सचिन म्हेत्रे, सचिन साळुंखे, पोलीस उपनिरीक्षक चव्हाण यांनी केले. ग्रामस्थांच्या वतीने वारकऱ्यांसाठी पिठलं-भाकरीची व्यवस्था करण्यात आली होती.