शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्यांदा घटस्फोट; एकटेपणामुळे पुनर्विवाह, सेकंड इनिंग सुरु...

By नम्रता फडणीस | Updated: August 7, 2024 18:25 IST

वय अणि परिस्थितीचा विचार करून दोघांनी पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतला अन् पुनर्विवाह करून नव्याने सेकंड इनिंग सुरु केली

पुणे: खरंतर दोघांचा प्रेमविवाह. पण, दोघांचा संसार सहा वर्षच चालला. त्यानंतर दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेतला. परंतु दोघे वेगळे तर झाले पण दोघांनाही एकटेपणा जाणवू लागला. वय अणि परिस्थितीचा विचार करून दोघांनी पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतला. दोघांनी पुनर्विवाह करून नव्याने सेकंड इनिंग सुरु केली.   राकेश (४०) आणि स्मिता (वय ३८) (नाव बदलले आहे) अशी दोघांची नावे आहेत. दोघांतर्फे ॲड. प्रणयकुमार लंजिले, ॲड. अनिकेत डांगे आणि ॲड. लक्ष्मण सावंत यांनी काम पाहिले. हे जोडपे मूळचे परराज्यातील आहे. दोघांना चांगली नौकरी आहे. एकमेकांच्या संपर्कात आल्यानंतर दोघांमध्ये प्रेम झाले. यातून दोघांनी २०१६ मध्ये विवाह केला. काही दिवस संसार सुरळीत सुरू होता. मात्र, राकेशला मद्याचे व्यसन होते. यातून तो तिला शारीरिक आणि मानसिक त्रास द्यायचा. तिचे सोन्याचे दागिने विकले. दोघातील वाद विकोपाला गेले. तिने कौटुंबिक हिंसाचार कायद्यानुसार दावाही दाखल केला. नंतर २०२२ मध्ये परस्पर संमतीने घटस्फोट घेतला. दोघांना अपत्य नव्हते. त्यानंतर वर्षभर ते वेगळे राहिले. मात्र, काही कारणाने पुन्हा संपर्कात आले. बोलू लागले. यातून दोघांना एकटेपणा जाणवत असल्याचे लक्षात आले. त्यांनी वकिलांशी संपर्क साधला. घटस्फोटानंतर पुन्हा विवाह करता येत असल्याचा सल्ला ॲड. प्रणयकुमार लंजिले यांनी दिला. या सल्ल्याने दोघांनी पुन्हा एकत्रित येण्याचा निर्णय घेतला. जुलै महिन्यात त्यांनी पुन्हा लग्न केले. दोघांनी नव्याने इनिंग सुरू केली आहे. यामुळे दोघांना जीवनभराचा आधार मिळणार आहे.

टॅग्स :Puneपुणेhusband and wifeपती- जोडीदारDivorceघटस्फोटmarriageलग्नSocialसामाजिक