फिरोदिया करंडक; प्राथमिक फेरीस सुरुवात
By Admin | Updated: February 16, 2016 01:12 IST2016-02-16T01:12:26+5:302016-02-16T01:12:26+5:30
तरुणाईचे भावविश्व उलगडणाऱ्या फिरोदिया करंडक स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला सोमवारी तरुणाईच्या उत्साहात सुरुवात झाली.

फिरोदिया करंडक; प्राथमिक फेरीस सुरुवात
पुणे : तरुणाईचे भावविश्व उलगडणाऱ्या फिरोदिया करंडक स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला सोमवारी तरुणाईच्या उत्साहात सुरुवात झाली. या स्पर्धेच्या निमित्ताने दहा दिवस विद्यार्थ्यांच्या उत्साहाला उधाण येणार आहे.
फिल्मसिटीचे माजी संचालक लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. उद्योजक मिलिंद मराठे, शशांक परांजपे, स्पर्धेचे संस्थापक सूर्यकांत कुलकर्णी, विश्वस्त जयश्री फिरोदिया तसेच परीक्षक प्रसाद वनारसे, हृषिकेश देशपांडे, क्षितीज पटवर्धन, केदार पंडित, श्रुती मराठे व संयोजक अजिंक्य कुलकर्णी उपस्थित होते. सामाजिक आर्थिक विकास संस्था, स्वप्नभूमी निर्मित फिरोदिया करंडक आंतर महाविद्यालयीन स्पर्धेचे यंदाचे ४२ वे वर्ष आहे.
विश्वकर्मा अभियांत्रिकीने ‘अगाध’ ही एकांकिका सादर केली. डी. वाय. पाटील विद्यापीठाने ‘मंगळयान’, अभियांत्रिकी महाविद्यालय औरंगाबादने ‘धूवाँ’ तर फर्ग्युसनने ‘पॅरीस, मॉन, अमॉर’ या विषयांचे सादरीकरण केले. (प्रतिनिधी)