चाकण येथे युवकावर गोळीबार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 13:36 IST2018-05-29T13:36:56+5:302018-05-29T13:36:56+5:30

आर्थिक देवाण घेवाणीच्या वादातून एका युवकावर पिस्तुलमधून गोळी झाडून प्राणघातक हल्ला करण्यात आला.

Firing on a youth at Chakan | चाकण येथे युवकावर गोळीबार

चाकण येथे युवकावर गोळीबार

ठळक मुद्देहल्लेखोर फरार, दोघांवर गुन्हा दाखल

चाकण : चाकण येथे रोहकल रस्त्यावर आर्थिक देवाण घेवाणीच्या वादातून एका युवकावर पिस्तुलमधून गोळी झाडून प्राणघातक हल्ला करण्यात आला. मात्र, प्रसंगावधान राखून हात आडवा घातल्याने युवकाच्या मनगटातून गोळी आरपार गेल्याने युवकाचे प्राण वाचले. हल्ला केल्यानंतर हल्लेखोर फरार झाले आहे. याबाबत भारती सुनील काचोळे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत पवार यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सोमवारी ( दि. २८ ) दुपारी सव्वातीन ते पावणेचारच्या सुमारास रोहकल रस्त्यावर घडली. या घटनेत रमेश पंढरीनाथ लांडे ( वय ४५, रा. बिरदवडी, ता.खेड, जि.पुणे ) हे जखमी झाले आहे. याप्रकरणी निलेश दामोदर मांडेकर ( रा. आंबेठाण, ता.खेड, जि.पुणे ) व नवनाथ काळुराम पानसरे ( रा. रोहकल, ता.खेड, जि.पुणे ) यांच्यावर रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींनी हल्ल्यात पिस्तुल व तलवारीचा वापर केला. गुन्ह्याचा पुढील तपास चोकण पोलीस करत आहे. 

Web Title: Firing on a youth at Chakan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.