पुणे जिल्ह्यातील सणसवाडीत भररस्त्यात गोळीबार, एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 14:06 IST2018-01-19T13:30:23+5:302018-01-19T14:06:39+5:30
पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील सणसवाडी शुक्रवारी (19 जानेवारी) सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरुन जात असताना एकावर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला आहे.

पुणे जिल्ह्यातील सणसवाडीत भररस्त्यात गोळीबार, एकाचा मृत्यू
कोरेगाव भीमा : पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील सणसवाडी शुक्रवारी (19 जानेवारी) सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरुन जात असताना एकावर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
गंगाराम बाबुराव दासरवड (वय २६ वर्ष) यांचा गोळीबारात मृत्यू झाला आहे. गंगाराम दासरवड हे मूळचे नांदेडमधील मुखेड तालुक्यातील रहिवासी होते. सध्या ते सणसवाडी येथे वास्तव्यास होते. ते औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांतील कर्मचाऱ्यांना डबा पोहोचविण्याचे काम ते करत असत.
शुक्रवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास ते दुचाकीहून जात असताना अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला व यात त्यांचा मृत्यू झाला.
वाघोलीतील खासगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. या गोळीबाराचे कारण अद्याप समजू शकले नाही. दरम्यान पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. प्रथमदर्शनी आर्थिक वादातून हा प्रकार घडल्याची शक्यता व्यक्त होत आहे.