शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

पुण्यात व्यावसायिकावर झाडली गोळी, जुन्या वादातून संघटनेच्या सदस्यावर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2022 00:41 IST

शहरातील गजबजलेला कॅम्प येथील फॅशनस्ट्रिट परिसरात व्यापारी संघटनेतील दोघांमध्ये असलेल्या पूर्वीच्या वादातून एकाने गोळीबार केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली.

पुणे- कॅम्प परिसरात एका व्यवसायिकावर आपसातील वादातून गोळी झाडल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री घडली. मोहम्मद रफी चौक, ए बी सी फार्म जवळ ही घटना घडली. फॅशन व्यवसायिक संघटनेचा सदस्य असलेला तोफिक अख्तर शेख (४५) यांच्यावर, त्याच्याच व्यापारी सहकाऱ्याने सायंकाळी ८ च्या सुमारास गोळी झाडली आणि तो फरार झाला. व्यापाऱ्यांमध्ये असलेल्या जुन्या व्यवसायिक आणि प्रशासकीय वादामुळे हे कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे.

शहरातील गजबजलेला कॅम्प येथील फॅशनस्ट्रिट परिसरात व्यापारी संघटनेतील दोघांमध्ये असलेल्या पूर्वीच्या वादातून एकाने गोळीबार केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. दरम्यान, रात्री उशीरापर्यंत याप्रकरणी लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. 

याबाबत लष्कर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तोफिक अख्तर शेख ( ४५) (रा. भीमपुरा, कॅम्प पुणे) हा फॅशन मार्केट येथील व्यवसायिक आसून तो येथील व्यापारी संघटनेचा पदाधिकारी देखील आहे. सध्या फिर्यादी शेख यांचे  पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासाविरोधात पुणे न्यायालयात खटले सुरू आहेत. व्यापाऱ्यांमध्ये असलेल्या वादामुळे शेख यांचा दुसऱ्या सहकाऱ्यासोबतही वाद झाला. आज तोफिक शेख सायंकाळी 8 च्या सुमारास ए बी सी फार्म दुकानाजवळ आला असता आरोपी तेथे छऱ्याची  बंदूक घेऊन पोहोचला.  तोफिक याला पाहून त्याने तोफिक वर बंदूक रोखत गोळीबार केला. या गोळीबारांत तोफिक जखमी झाला. आरोपीने फिर्यादी शेख यांच्या पोटावर छऱ्याच्या बंदुकीतून एक गोळी झाडली असता ती फिर्यादी यांच्या बरगडी खाली घासून निघून गेली आसून सध्या फिर्यादीला ससून रुग्णालयात वॉर्ड क्र ७ मध्ये पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. गर्दीने गजबजलेल्या ठिकाणी ऐन रात्रीच्या वेळी गोळीबार झाल्याने एम जी रोड वर मोठी खळबळ उडाली आहे.

लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी म्हटले आहे, की फिर्यादीकडून मिळालेल्या माहिती नुसार, जुन्या वादातून ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटना स्थळी पोहोचले. यासंदर्भात तपास सुरू करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणेPoliceपोलिस