शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

Whats App चॅटिंगवरून झालेल्या बाचाबाचीत गोळीबार; सिंहगड रस्त्यावरील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2023 14:42 IST

जखमी नागरिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल

धायरी : व्हॉट्स ॲप ग्रुपवर झालेल्या चॅटिंगवरून झालेल्या बाचाबाचीत एका बांधकाम व्यावसायिकाने एकावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. विशेष म्हणजे गोळीबार झालेल्या ठिकाणापासून सिंहगड पोलीस ठाणे हे हाकेच्या अंतरावर आहे. यात रमेश राठोड (रा. वारजे, पुणे) हे जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी संतोष पवार (रा. बावधन, पुणे) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

मिळालेली माहिती अशी की, संतोष पवार, देवा राठोड व रमेश राठोड यांच्यासह अन्य काहीजण  सिंहगड रस्ता परिसरातील सनसिटी भागातील योगीराज ऑटो सेंटरमध्ये चर्चा करीत होते. यातील देवा राठोड यांनी त्यांच्या समाजाच्या व्हॉट्सॲप ग्रूपवर संतोष पवार यांच्याबद्दल काहीतरी लिहिले होते. यावरून संतोष पवार व देवा राठोड यांच्यात बाचाबाची झाली. या भांडणात रमेश राठोड हे मध्ये पडल्याने संतोष पवार यांनी कमरेला असणारी पिस्तूल काढून रमेश राठोड यांच्या दिशेने गोळीबार केला. यात रमेश राठोड यांच्या पायाला गोळी लागल्याने ते जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता विभागाचे सहायक पोलिस आयुक्त राजेंद्र गलांडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) जयंत राजुरकर व कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पुढील तपास सिंहगड रस्ता पोलीस करीत आहेत. 

पोलीस संरक्षण असताना केला गोळीबार...

संतोष पवार हे बांधकाम व्यावसायिक असून ते जमीन विकसक म्हणून काम करतात. त्यांच्याकडे परवाना असलेले पिस्तूल असून त्यांच्या संरक्षणासाठी एक पोलीस कर्मचारी सुद्धा आहे. मात्र असे असतानाही त्यांनी रमेश राठोड यांच्यावर गोळीबार केल्याची घटना घडली आहे.

टॅग्स :DhayariधायरीPuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक