शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
3
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
4
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
5
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
6
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
7
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
8
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
9
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
10
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
11
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
12
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
13
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
14
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
15
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
16
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
17
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
18
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
19
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
20
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले

उजनीच्या अवकाशात झेपावले अग्निपंख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 8:24 PM

तब्बल दोन-अडीच महिन्यांच्या काळानंतर हजारो किलोमीटरचा प्रवास करून रोहित ऊर्फ फ्लेमिंगो पक्षी उजनी जलाशयाच्या पाणथळ भागात दाखल झाले आहेत.

ठळक मुद्देगेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने उजनी जलाशयात मुबलक पाणीसाठा परप्रांतीय व वाळू व्यावसायिकांचा त्रास...

न्हावी : लाल-गुलाबी रंगाच्या अग्निपंखांनी उजनीच्या अवकाशात झेप घेतली आहे. हजारो किलोमीटरचा प्रवास संपवून रोहित पक्षी उजनीच्या आश्रयाला आले आहेत. त्यामुळे आपसूकच पक्षीप्रेमी, पर्यटक व हौशी छायाचित्रकारांची पावले उजनीच्या दिशेने वळाली आहेत. तब्बल दोन-अडीच महिन्यांच्या काळानंतर हजारो किलोमीटरचा प्रवास करून रोहित पक्षी उजनी जलाशयाच्या पाणथळ भागात दाखल झाले आहेत. डिकसळ पूल, भिगवण, तक्रारवाडी, पळसदेव, शिंदेवस्ती आणि खादगाव या ठिकाणी सध्या रोहित ऊर्फ फ्लेमिंगोचे वास्तव्य आढळत आहे. जवळपास चारशे ते पाचशेच्या संख्येने हे पक्षी दाखल झाले आहेत. लालबुंद चोच, लांबसडक मान, उंच असणारे पाय असे त्यांचे लोभस रूप असल्यामुळे त्यांना ‘अग्निपंख’असेही संबोधले जाते. हजारोंच्या संख्येने पक्षी दाखल झाल्यावर त्यांच्या पाण्यामधील शिस्तबद्ध हालचाली नेत्रसुखद ठरतात व भक्ष्य पकडण्यासाठी त्यांनी घेतलेला पवित्रा मनाला मोहून टाकतो. या पक्ष्यांचे थवेच्या थवे असल्याने पाण्यात त्यांच्या जणू काही कवायती चालल्याचा भास होतो. गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने उजनी जलाशयात मुबलक पाणीसाठा होता. पाणथळीच्या जागा उपलब्ध नसल्याने या ठिकाणी खाद्य मिळत नव्हते. त्यामुळे यंदा पक्ष्यांचे आगमन लांबणीवर पडले होते. त्यामुळे पक्षीप्रेमींची निराशा झाली होती. त्यांच्या आगमनाची सर्व जण आतुरतेने वाट पाहत होते. उजनी धरण साखळीतील पाणीसाठा कमी झाल्याने मागील सात-आठ दिवसांपासून चारशे-पाचशेच्या आसपास फ्लेमिंगो पाणलोट क्षेत्रात दाखल झाल्याने पक्षीप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. महिनाभरात आणखी पक्षी दाखल होऊन रोहित पक्ष्यांच्या सुंदर ‘कवायती’ पाहायला मिळतील, अशी अपेक्षा पक्षीप्रेमी व्यक्त करीत आहेत. रोहित पक्ष्यांचे आगमन उशिरा झाले असले, तरी या ठिकाणी सीगल, राखी बगळा, करकोचा, काळा शराटी, पेंटेड स्टॉर्क, पाणकोंबड्या, तूतवार तापस आदी जातींचे पक्षी दाखल झाल्याने उजनीकाठ चांगलाच बहरून गेला आहे. राज्यातील पर्यटकांना पक्षी पाहण्याची ही अनोखी संधी उपलब्ध होणार आहे. 

पक्ष्यांच्या होतात शिकारी....उजनी जलाशयात विणीच्या हंगामासाठी शेकडो जातींचे लाखो पक्षी दाखल होतात. मात्र, वन विभागाच्या दुर्लक्षामुळे या ठिकाणी पक्ष्यांची शिकारी होण्याचे प्रमाण वाढले आहे. पक्षी भक्ष्य पकडण्याचा प्रयत्न करीत असतात, त्या वेळी काही हौशी पर्यटक आणि मच्छीमार जाळी लावून अथवा फासे टाकून त्यांची शिकार करतात. अशांवर कारवाई करण्याची मागणी पक्षीप्रेमी करीत आहेत. 

परप्रांतीय व वाळू व्यावसायिकांचा त्रास...उजनी जलाशयात मासेमारी चालते. यामध्ये परप्रांतीय मच्छीमारांकडून पक्ष्यांची शिकार करण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. त्याचप्रमाणे याच परिसरात यांत्रिक बोटीच्या साह्याने वाळू काढण्याचे प्रकारदेखील घडतात. त्यामुळे बोटींच्या कर्णकर्कश आवाजाने; तसेच बोटींसाठी वापरण्यात येणारे आॅईल पाण्यात पडण्याने पाणी प्रदूषणाच्या समस्येमुळेदेखील पक्ष्यांच्या अधिवासावर परिणाम झालेला आहे.

टॅग्स :PuneपुणेUjine Damउजनी धरण