शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

'सिरम'मधील आगीच्या घटनेची राज्य सरकारच्या विविध यंत्रणांमार्फत शहानिशा करणार : अजित पवार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2021 22:05 IST

उद्या विविध पथकांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतरच आगीत किती जीवितहानी झाली हे कळेल.

ठळक मुद्देसिरम इन्स्टिटयूटला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट

पुणे : मांजरी येथे असणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूटच्या एसईझेडमधील इमारतीच्या चौथ्या व पाचव्या मजल्यावर गुरुवारी दुपारी २ वाजून ३३ मिनिटांनी भीषण आग लागली. या आगीत इमारतीमधील ५ कामगारांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मात्र दुपारी लागलेली आग आता आटोक्यात आली आहे. सर्व प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहे. अद्याप आगीचे कारण अस्पष्ट आहे. उद्या पाहणी केल्यानंतरच ते स्पष्ट होणार आहे. तसेच नेमकी  किती जीवितहानी झाली आहे हे सांगता येणार आहे. कुणी काही आरोप केले तरी राज्यातील जनतेने अजिबात घाबरून जाण्याचे कारण नाही.या घटनेची राज्य सरकारच्या विविध यंत्रणांमार्फत शहानिशा केली जाणार आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. 

अजित पवार यांनी रात्री साडे सात वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची माहिती जाणून घेतली. यावेळी ते बोलत होते. या भेटीच्या वेळी हडपसर मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चेतन तुपे, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, जिल्हाधिकारी डॉ.  राजेश देशमुख उपस्थित होते. पवार म्हणाले, सिरममध्ये आज दुपारी लागलेली आग आटोक्यात आली आहे. सर्व प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहे. मात्र अद्याप आगीचे कारण अस्पष्ट आहे. उद्या पाहणी होईल व कारण कळेल व किती जीवितहानी हे स्पष्टपणे सांगता येणे शक्य आहे. तसेच आग लागल्यानंतर सुरवातीच्या काळात या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही नसल्याचे सांगण्यात आले होते. मात्र इमारतीमध्ये काम सुरु असल्याने ५ कामगारांचे पूर्णपणे जळालेले मृतदेह मिळाले आहे. यात हे पाचच मृत्यू असावे असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यात दोन पुणे, एक बिहार, दोन उत्तर प्रदेशच्या कामगारांचा समावेश आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या घटनास्थळाला भेट देणार आहे. मात्र ज्या ठिकाणी कोरोना लसची निर्मिती होत आहे तिथे काहीही नुकसान झालेले नाही. कोविशील्ड लस सुरक्षित आहे.इतर लस बनवण्यासाठी प्रयत्न केल जात होते त्या ठिकाणी ही आग लागली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या इमारतीच्या पहिल्या, दुसऱ्या मजल्यावर आले होते त्याच इमारतीच्या वरच्या मजल्याला आग लागली आहे. फायर ऑडिट व इतर टीम आग लागलेल्या ठिकाणी भेट देणार असून माहिती घेणार आहे. येथे आता सुरक्षा आहे आणि काही पोलिस देखील असणार आहे, असेही पवार यावेळी म्हणाले.  

 उपमुख्यमंत्र्यांनी केले अग्निशामक दलाचे कौतुक..  पाणी मुबलक होते. पण आग भडकल्यामुळे अग्निशामक दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रचंड कष्ट घ्यावे लागले. तसेच पाण्याच्या काही ठिकाणी काचा फोडून आत प्रवेश करावा लागला. अग्निशामक दलाने भीषण आगीवर मिळवलेले नियंत्रण हे कौतुकास्पद आहे. आत पूर्ण अंधार होता. पण उद्या याविषयी सर्व माहिती घेउन कारण काय आहे हे स्पष्ट होईल. या घटनेची नियमावलीनुसार सर्वकाही तपासले जाणार असल्याचे देखील पवार यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारCorona vaccineकोरोनाची लसfireआगfire brigade puneपुणे अग्निशामक दलDeathमृत्यूState Governmentराज्य सरकार