शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

पुण्यातील रविवार पेठेत जुन्या वाड्याला भीषण आग; एकजण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2020 01:40 IST

रविवार पेठेतील मिरा दातर दर्ग्याजवळील जुन्या वाड्याला शुक्रवारी रात्री पावणे दहा वाजता भीषण आग लागली.

पुणे: रविवार पेठेतील मिरा दातर दर्ग्याजवळील जुन्या वाड्याला शुक्रवारी रात्री पावणे दहा वाजता भीषण आग लागली. या आगीत एक जण जखमी झाला. छोट्या रस्त्यांमुळे अग्निशामक दलाचे वाहन घटनास्थळी पोहोचू शकत नव्हते. मात्र जवानांनी मोठी पाईपलाईन टाकून प्रत्यक्ष ठिकाणी पाण्याचा मारा सुरू केल्याने आग विझवण्यास यश मिळाले.      रविवार पेठेमध्ये लाकडाचे बांधकाम असलेला हा तीन मजली वाडा आहे. तिसऱ्या मजल्यावरील घराला आग लागल्याने काळा धूर येण्यास सुरुवात झाली. अग्निशामक दलाची गाडी बोलावण्यात आली.  मात्र  वाहनाला अरुंद रस्त्यांमुळे घटनास्थळी पोहोचणे अवघड झाले.  जवानांनी तात्काळ मोठी पाईपलाईन टाकून पाण्याचा मारा सुरू केला. त्याचप्रमाणे धोका दूर करून ८ सिलेंडर बाहेर काढले. लाकडी वाडा असल्याने वॉटर टँकर ची मदत घेण्यात आली. धूर बाहेर जाण्यास अडचण येत असल्याने घरावरचे पत्रे उचकटून आगीला बाहेर जाण्याचा रस्ता करून देण्यात आला..जवानांना आग विझवण्यात यश मिळाले. आगीमध्ये घरगुती साहित्य जळून खाक झाले. प्राथमिक माहितीनुसार मेणबत्ती चालू राहिल्याने आग लागली असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.    दरम्यान, युनूस युसूफ शेख यांना रुग्णालयात नेण्यासाठी १०८ वाहन उपलब्ध न झाल्याने त्यांना खासगी गाडीतून ससून रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दलाचे अधिकारी प्रकाश गोरे, फायरमन गावडे, मनीष बोंबले, राजेश कांबळे, अजीम शेख आणि वाहनचालक मोहिते यांनी ही कामगिरी केली......

टॅग्स :Puneपुणेfireआगfire brigade puneपुणे अग्निशामक दल