शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

कोथरुडचे मनसे कार्यालय पेटवून देण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2019 15:58 IST

ही घटना डहाणुकर कॉलनीतील  पीएनजी शोरुमसमोर असलेले मनसे कार्यालयात २२ ऑक्टोबरला रात्री सव्वा नऊ ते पावणे दहा वाजण्याच्या सुमारास घडली़. 

पुणे : मतदान झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी कोथरुडमधील डहाणुकर कॉलनीमधील मनसेचे कार्यालय पेटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला़.  कार्यालयाला लागलेली आग किरकोळ स्वरुपाची होती़.  त्यात आतील फायबरचे शीट जळाले़.  ही घटना डहाणुकर कॉलनीतील  पीएनजी शोरुमसमोर असलेले मनसे कार्यालयात २२ ऑक्टोबरला रात्री सव्वा नऊ ते पावणे दहा वाजण्याच्या सुमारास घडली़.            या प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी हेमंत रमेश संभुस (वय ४६, रा़ वंडर फ्युचुरा, कोथरुड) यांनी कोथरुड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़. याबाबत पोलिसांनी सांगितले की, डहाणुकर कॉलनीत रोडच्या कडेला स्वयंभु प्रतिष्ठान व मनसेचे कार्यालय आहे़.  हेमंत संभुस व त्यांचे सहकारी मतदान झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी कार्यालयात रात्री सव्वानऊपर्यंत थांबले होते़.  ते कार्यालयातून निघून गेल्यानंतर कोणीतरी ते पटवून देण्याचा प्रयत्न केला़ परंतु, स्थानिक नागरिकांना हा प्रकार लगेच लक्षात आल्यावर त्यांनी व कार्यकर्त्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला़.  अग्निशामक दलाची गाडी तातडीने घटनास्थळी पोहचली व तिने आग पूर्णपणे विझविली़. 

         आगीमध्ये कार्यालयातील फायबरचे शीट जळाले आहे़.  कोथरुड मतदारसंघात पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि मनसेचे किशोर शिंदे अशी सरळ लढत होती़.  मतदानामध्ये शिंदे यांना सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळाल्याचे मतदानानंतर सर्वत्र सांगितले जात होते़. त्यातून कोणीतरी हे कार्यालय पेटविण्याचा प्रयत्न केला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. विधानसभेची मतमोजणी असल्याने त्यानंतर संभुस यांनी फिर्याद दिली आहे़.  सहायक पोलीस निरीक्षक उमेश माळी अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :MNSमनसेfireआगkothrudकोथरूड