मार्केट यार्ड परिसरात आग; एका दुकानासह दोन घरे जळून खाक, जीवितहानी नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 11:58 IST2017-10-13T11:53:04+5:302017-10-13T11:58:57+5:30
मार्केट यार्ड परिसरात लागलेल्या आगीत एका दुकानासह २ घरे जळून खाक झाली आहेत. मध्यरात्री १२ दरम्यान ही घटना घडली.

मार्केट यार्ड परिसरात आग; एका दुकानासह दोन घरे जळून खाक, जीवितहानी नाही
पुणे : येथील मार्केट यार्ड परिसरात लागलेल्या आगीत एका दुकानासह २ घरे जळून खाक झाली आहेत. मध्यरात्री १२ दरम्यान ही घटना घडली.
प्राथमिक माहितीनुसार प्रेमनगर परिसरात सिलेंडरचा स्फोट झाला. हे दुकान गॅरेज, स्पेअर पार्ट्सचे असल्याने येथील साहित्य, एक दुचाकी तसेच आॅईच्या कॅनने पेट घेतला. क्षणार्धातच आगीने रौद्र रुप धारण केले. यात संपूर्ण दुकान जळून खाक झाले. या सह दुमजली घरालादेखील आग लागली. यात घरातील संपूर्ण साहित्य खाक झाले. दीडच्या दरम्यान आगीची बातमी अग्निशामकदलाला कळविण्यात आली. घटनास्थळी अग्निशामकदलाच्या ३ गाड्या दाखल झाल्या. मध्यरात्री २ दरम्यान आग आटोक्यात आली. या वेळी एक पेटता सिलेंडरदेखील बाहेर काढण्यात आला.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. तसेच जखमीही झाले नाही. पुढील तपास पोलीस करीत आहेत.